शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 17:58 IST

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंचे भीतीसंगम नाटक फ्लॉफ ठरणार असेही ते म्हणाले.

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray: विधानसभा निवडणुकांनंतर चर्चेत असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीतही भाजपाने दमदार यश मिळवले. राज्यभरात भाजपाचे अनेक नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले. तुलनेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा गटाला अपेक्षित यश मिळाले नाही. या अपयशानंतर भाजपाने उबाठा गटाला उद्देशून बोचरी टीका केली. महानगरपालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’ ठरतील आणि उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत' ठरतील अशी टीका भाजपाने केली.

"नगरपालिका, नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना धूळ चारली. नगरपालिकांपाठोपाठ आता महापालिका निवडणुकांमध्ये देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’ ठरणार आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या लोकांना उबाठा गटामध्ये सामील करून घेतले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राऊत हेच रेहमान डकैत असल्याचे भाजपाचे माध्यमविभाग प्रमुख नवनाथ बन म्हणाले. नगर पालिका, नगर पंचायत निवडणुकीत धुरंधर कोण यावर मतदारांनीच शिक्कामोर्तब केल्याचेही ते म्हणाले.

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये पराभव होण्याची भीती असल्यानेच ठाकरे बंधू एकत्र येऊन ‘प्रीतिसंगम’ नव्हे तर ‘भीतीसंगम’ नाटक सादर करणार आहेत. हा 'भीतीसंगम' प्रयोग मतदार फ्लॉप ठरवणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भावाला घरातून हाकलले, त्यांचा मनसे पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला होता. आता पराभवाच्या भीतीमुळे याच भावासाठी प्रीतीचे खोटे भरते येत असल्याची टीकाही त्यांनी केली.

"राज ठाकरे १०० जागांची मागणी करत असताना त्यांच्या मनसेला ६० जागा देऊन त्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न उबाठा गटाकडून होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्याची होत असलेली विकासाची घोडदौड मतदारांसमोर आहे. म्हणूनच ठाकरे बंधूंच्या या भीतीसंगम नाटकाच्या प्रयोगाचा कितीही गाजावाजा करत घाट घातला तरी ते नाटक रंगमंचावर येण्याआधीच पडणार हे निश्चित आहे. महायुतीचा प्रयोग हाउसफुल्ल होणार आणि मुंबईसह सर्व महापालिका निवडणुकांमध्ये भाजपा महायुतीचाच झेंडा फडकणार," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP slams Thackeray: Fadnavis triumphs, Thackeray is 'Rehman Dakait'.

Web Summary : BJP claims Fadnavis outshines Thackeray in elections. They criticize Thackeray, labeling him 'Rehman Dakait,' and predict a similar outcome in upcoming municipal elections. They also mock the Thackeray brothers' alliance as a 'fear union' doomed to fail.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६BMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक २०२६Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा