शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"लिफ्ट मागितली तरी ते सहाव्या मजल्यापर्यंत पोहचणार नाहीत’’, फडणवीस-ठाकरे भेटीवर एकनाथ शिंदेंची खोचक प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 18:39 IST

Eknath Shinde News: मागच्या पाच वर्षांत एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक बनलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devenda) यांची विधान भवनात समोरासमोर भेट होऊन दोघांनीही एकत्र लिफ्टने प्रवास केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी या भेटीवर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस अनेक घडामोडींमुळे चांगलाच गाजला. त्यात अधिवेशनाच्या सुरुवातीलाच मागच्या पाच वर्षांत एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक बनलेल्या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची विधान भवनात समोरासमोर भेट होऊन दोघांनीही एकत्र लिफ्टने प्रवास केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी या भेटीवर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ती लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या लिफ्टमधील प्रवासाबाबत एकनाथ शिंदे म्हणाले की, कुणी लिफ्ट मागितली तरी ते सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. तसेच दोन वर्षांपूर्वी त्यांनी लिफ्ट शिफ्ट केल्यामुळे, ते काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो. तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं. त्यामुळे काही लोकं बोलताहेत, काही लोकं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले म्हणून तिसऱ्यांदा पेढे वाटताहेत, आनंद आहे, चांगलं आहे, असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं. भाजपाच्या २४० जागा आल्या. तर इंडिया आघाडीच्या सगळ्यांच्या मिळून तेवढ्या जागा आल्या नाहीत. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. तर जनतेने तुम्हाला पराभूत केलं. एवढं खोटं नरेटिव्ह परवून, संविधान बदलणार, आरक्षण जाणार असं खोटं वातावरण निर्माण करूनसुद्धा या देशातील जनतेनं नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवलं, याचा आनंद विरोधक साजरा करताहेत, याचा आम्हाला आनंद आहे, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेvidhan sabhaविधानसभा