शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी कमावती असली तरी मुलीची जबाबदारी पित्यावरही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 08:27 IST

Court News: पत्नी कमावती असली तरी जन्म दिलेल्या मुलीची आर्थिक जबाबदारी ही उच्चशिक्षित वडिलांचीसुद्धा आहे, असे सांगत  कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश बी. डी. कदम यांनी  मुलीसाठी दरमहा १० हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश पतीला दिला. 

 पुणे - पत्नीला इतका चांगला पगार आहे की त्यात ती मुलीचा उत्तम सांभाळ करू शकते. हा पतीने केलेला युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला. पत्नी कमावती असली तरी जन्म दिलेल्या मुलीची आर्थिक जबाबदारी ही उच्चशिक्षित वडिलांचीसुद्धा आहे, असे सांगत  कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश बी. डी. कदम यांनी  मुलीसाठी दरमहा १० हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश पतीला दिला. 

मीना व रमेश ( नावे बदललेली आहेत)  यांचा २०१९ मध्ये विवाह झाला. दोघांना साडेतीन वर्षांची मुलगी आहे. सुरुवातीपासूनच त्यांच्यात छोट्यामोठ्या कुरबुरी सुरू होत्या. रोजच्या कटकटींना कंटाळून पत्नीने ॲड. शोभा सोमाणी यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालय येथे घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. पतीमार्फत योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता न्यायालयात होत नव्हती, म्हणून पत्नीने तात्पुरत्या पोटगीसाठी न्यायालयात  अर्ज दाखल केला.

पतीने ‘मी काम करीत नाही, पत्नीमुळे माझी नोकरी गेली. मलाच पत्नीकडून पोटगी पाहिजे.  नाहीतर मी फाशी घेईन, अशी कारणे न्यायालयात सांगितली. पती हा उच्चशिक्षित आहे. २०१९ मध्ये त्याला महिना ३५ हजार  रुपयांची नोकरी असलेली पावती पत्नीने वकिलांमार्फत न्यायालयात दाखल केली. पत्नी व मुलगी यांच्याव्यतिरिक्त पतीवर कुटुंबातील इतर कुणीही अवलंबून नसल्याचा युक्तिवाद पत्नीच्या वकिलांनी केला. पत्नीचा चांगला पगार आहे. ती मुलीचा आर्थिक भार पेलू शकते, असा युक्तिवाद पतीमार्फत करण्यात आला. त्यावर मुलीची जबाबदारी नको होती तर जन्म कशाला दिला, असा सवाल न्यायालयाने पतीला केला. 

पत्नीला महिना ८० हजार पगार असला तरी जन्म दिलेल्या पाल्याच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, औषधोपचार या मूलभूत गरजा पूर्ण करणे हे माता-पिता दोघांचे कर्तव्य आहे.- ॲड. शोभा सोमाणी, पत्नीच्या वकील 

पूर्वीच्या पगाराचा विचार करता आज पतीला महिना ५० हजार रुपयांची नोकरी नक्कीच  असेल. पत्नी आर्थिकदृष्ट्या स्वत:साठी सक्षम आहे. परंतु मुलीसाठी १० हजार रुपये दर महिना तात्पुरती पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपCourtन्यायालय