शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

शिवसेनेचे ४० आमदार परतले तरी सरकारला धोका नाही; बच्चू कडूंनी मांडले गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 13:13 IST

दोन लोकांचे सरकार असलं तरी ते सक्षम आहेत. हे पहिल्यांदा होतंय असं नाही. मंत्रिमंडळ विस्तार लांबला हे मान्य आहे परंतु शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू दिला नाही असं आमदार बच्चू कडू यांनीसां

अमरावती - नाना पटोलेंना माहिती नसावी. अपंगांना कमकुवत समजत असाल तर ते तुम्हाला कळाले नाहीत. दिव्यांग कमकुवत नाहीत. तुमच्यापेक्षा सक्षम आणि मजबूत आहेत. दिव्यांगांना कमकुवत समजण्याचं डोक्यातून काढून टाका. पॅरा ऑल्मपिकमध्ये सगळ्यात जास्त पदके दिव्यांगांनी आणली. नाना पटोलेंनी हे शब्द मागे घेतले पाहिजे. दिव्यांगांना कमकुवत समजत असाल तर त्याचा हिशोब आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. 

बच्चू कडू म्हणाले की, दोन लोकांचे सरकार असलं तरी ते सक्षम आहेत. हे पहिल्यांदा होतंय असं नाही. मंत्रिमंडळ विस्तार लांबला हे मान्य आहे परंतु शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू दिला नाही. शेतकऱ्यांसाठी विविध निर्णय घेतले आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना अनुदान दिले आहे. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार आहे. पंचनामे करण्याचं काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी आहोत असं त्यांनी सांगितले. 

तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही. याबाबत जीआर आहे. अजितदादांना नियम आणि धोरणे माहिती आहे. त्यामुळे वेगळे काही मागणी करण्याची गरज नाही. ओला दुष्काळ कधी जाहीर करायचा याचे निकष आहेत. त्यानुसार तो जाहीर होईल. अजित पवार विरोधी पक्षनेते आहेत त्यामुळे त्यांना या गोष्टीची कल्पना आहे. सध्या शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे. सरकार मदत द्यायला तयार मग आंदोलनाची गरज कशाला, सरकारने मदत केली नसती तर सरकारविरोधात उभं राहू असंही बच्चू कडू म्हणाले. 

शिवसेनेचे ४० आमदार परतले तरी...भीतीपोटी विस्तार होत नाही हे अत्यंत चुकीचे आहे. राज्यात आणि केंद्रात सरकार भाजपाचं मग भिती कुणाची? शिवसेनेचे ४० आमदार पुन्हा गेले तरी राज्यातील सरकार भाजपा आणि अपक्ष आमदारांचे मिळून बनते. त्यामुळे भीती हा विषय नाही. काही किंतुपरंतु असते. महाविकास आघाडीत दीड महिना ६ मंत्र्यांचे सरकार चालवले. मागचे दिवस विरोधकांनी पाहायला हवेत असा टोला बच्चू कडू यांनी विरोधकांना लगावला आहे. सरकार नव्याने आले आहे. न्यायालयीन बाब आहे. त्यात राज्यात अतिवृष्टी आहे त्यामुळे पहिलं प्राधान्य शेतकऱ्यांना दिले पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. या दौऱ्यापेक्षा विस्तार महत्त्वाचा आहे का? त्यामुळे विलंब होत असल्याचं बच्चू कडूंनी सांगितले.  

टॅग्स :BJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेBacchu Kaduबच्चू कडू