शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून एक रुपयाचीही मदत नाही; संभाजीराजे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 10:13 IST

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांची ओल्या दुष्काळानं अक्षरशः वाट लावली.

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांची ओल्या दुष्काळानं अक्षरशः वाट लावली. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या हातचं पीक वाया गेलं आहे. एवढं सगळं होऊनही केंद्रानं राज्यातील शेतकऱ्यांना मदत करताना हात आखडता घेतला होता. तोच धागा पकडत संभाजीराजेंनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला. राज्यसभेमध्ये संभाजीराजेंनी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मदत दिली जात नसल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. ट्विट करत त्यांनी सांगितलं की, विमा कंपन्यांची लूट व शेतकऱ्यांची परवड याविषयी संसदेत आवाज उठवला. कोल्हापूर - सांगली महापुराच्या नुकसान भरपाईचा आणि परतीच्या पावसाने खरिपाच्या नुकसान भरपाईचा एक रुपयाही अजून राज्याकडे पोहोचला नाही याचा जाब विचारून सरकारने तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सभागृहात सांगितले. तसेच त्यांनी पूर्ण भाषणाचा व्हिडीओसुद्धा प्रसिद्ध केला आहे.  2016मध्ये पंतप्रधान पीकविमा योजना केंद्रानं सुरू केली असली तरी शेतकऱ्यांचा याचा फायदा पोहोचलेला नाही. शेतकऱ्यांची फसवणूक करून विमा कंपन्यांनी आपलाच लाभ करून घेतला. शेतकऱ्यांनी केलेले नुकसानभरपाईचे दावेसुद्धा अनेक कंपन्यांनी धूळखात ठेवले. अशा पद्धतीनं विमा कंपन्यांकडून पैसे लाटण्याचा प्रकार असल्याचंही संभाजीराजे म्हणाले आहेत. ओल्या दुष्काळाच्या तीन महिन्यांनंतरही शेतकऱ्यांना मदतीचा एक पैसाही मिळालेला नाही,” अशी उद्विग्नताही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रामध्ये महापूर आणि परतीच्या पावसाने हातचं पीक वाया गेलं, त्यामुळे मोठं नुकसान झालं. आकडेवारीनुसार 54 लाख हेक्टर सुपीक शेतजमिनीला परतीच्या पावसाचा फटका बसला. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यानं केंद्राला दोन अहवाल पाठवूनसुद्धा केंद्रानं अद्याप कोणतीही मदत दिलेली नाही. पावसामुळे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी राज्यानं सात हजार 702 कोटींची केंद्राकडे मागणी केली होती, पण यातील एक रुपयाही केंद्राकडून महाराष्ट्राला मिळालेला नाही, असंही संभाजीराजे म्हणाले आहेत. 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीFarmerशेतकरी