शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

भाजपा आमदाराची फेरीवाल्यांना अर्वाच्च शिवीगाळ, पोलीस अधिका-यालाही दमदाटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 20:52 IST

सत्तारुढ भाजपाचे अंधेरीतील आमदार अमित साटम यांनी जुहूतील मिठीबाई कॉलेज परिसरातील फेरीवाल्यांवर अर्वाच्च शिवीगाळ व मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावरून व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे एका पोलीस अधिका-याला अत्यंत उद्धटपणे दमदाटी करीत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सांगत आहे.

मुंबई, दि. 10 - सत्तारुढ भाजपाचे अंधेरीतील आमदार अमित साटम यांनी जुहूतील मिठीबाई कॉलेज परिसरातील फेरीवाल्यांवर अर्वाच्च शिवीगाळ व मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावरून व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे एका पोलीस अधिका-याला अत्यंत उद्धटपणे दमदाटी करीत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सांगत आहे. त्यांच्या या कृत्याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.दरम्यान, हप्ता देत नसल्याने साटम यांनी मारहाण केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तक्रार फेरीवाला संघटनांनी जुहू पोलिसांकडे केली आहे. तर साटम यांनी त्याचा इन्कार करीत अनाधिकृतपणे बसणा-या फेरीवाल्यांविरुद्ध पालिकेला कारवाई करण्यास भाग पाडल्याचे सांगितले. सात सप्टेंबरला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. त्याचे व्हिडीओ रविवारी व्हायरल झाल्याने आमदार साटम यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.पश्चिम उपनगरातील जुहूतल्या मिठीबाई कॉलेजजवळील रस्त्यावर फेरीवाले अनधिकृतपणे अतिक्रमण करून परिसरातील वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण करीत असल्याचा आरोप करीत साठम यांनी शुक्रवारी दुपारी या फेरीवाल्यांना अर्वाच्च शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचबरोबर तेथे उपस्थित असलेल्या एका पोलीस अधिका-याला उद्देशून ‘ तुम्ही कमरेला पिस्तूल लावून फिरता शरम वाटली पाहिजे तुम्हाला, तुमचे काम मी करतो, तुमचा पगार माझ्या अकाऊंटवर जमा करा, अशी दमदाटी केल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते. एका मोबाईलवरून चित्रण केलेल्या एक मिनिटाची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, भाजपा व आमदार साटमवर टीकेची झोड उठली आहे.दरम्यान, फेरीवाल्यांनी याबाबत पोलिसांकडे लेखी तक्रार दिली असून, काही दिवसापासून दोघे जण आपल्याकडे साटम यांची माणसे असल्याचे सांगून हप्ता सुरू करण्यास सांगत होते, त्याला नकार दिल्यानंतर ७ सप्टेंबरला साटम यांनी स्वत: येऊन आपल्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. महापालिकेला व पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले. साटम यांच्या सुुरक्षारक्षकाने बंदुकीने एका फेरीवाल्याला मारहाण केल्याने चेह-यावर जखम झाली असून या सर्वांविरुद्ध खंडणी, दमदाटी व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंबई फेरीवाला युनियनतर्फे केली आहे.तर आमदार साटम यांनी या आरोपाचा इन्कार केला असून, हे फेरीवाले अनधिकृतपणे बसत असून त्यांच्यामुळे नागरिक व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असल्याने आपण पालिकेच्या कर्मचा-यांना कारवाई करण्यास भाग पाडले, असे सांगितले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.