विलास शिंदेंनंतरही पोलिसांवर हल्ले सुरूच
By Admin | Updated: September 1, 2016 18:22 IST2016-09-01T18:22:20+5:302016-09-01T18:22:20+5:30
विलास शिंदे यांच्या निधनाला 24 तास होत नाही तोपर्यंत आणखी एका पोलीस हवालदाराला बाईक ठोकल्याची घटना समोर आली आहे.

विलास शिंदेंनंतरही पोलिसांवर हल्ले सुरूच
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - वाहतूक पोलीस शाखेचे हवालदार विलास शिंदे यांच्या निधनाला 24 तास होत नाही तोच आणखी एका पोलीस हवालदाराला बाईक ठोकल्याची घटना समोर आली आहे.
विनोबा भावे पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या बैलबाजार चौकीवर कर्तव्य बजावत असताना नाकाबंदी दरम्यान देविदास अनिल निंबाळकर यांनी एका दुचाकीस्वारास थांबण्यास सांगितले असता त्यानं दुचाकी थेट निंबाळकर यांच्या अंगावर घातली. त्यामुळे पोलीस हवालदार देविदास निंबाळकर या अपघातात गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुचाकीस्वार इयास खान हा बाईक घेऊन सुसाट वेगानं जात होता. त्याचदरम्यान हवालदार निंबाळकर यांनी त्याला हटकलं आणि दुचाकी थांबवण्यास सांगितली.
मात्र त्याला त्याचा राग येऊन त्या मुस्लिम तरुणानं बाईक थेट त्यांच्या अंगावर घातली. पसार होण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याला पोलिसांनी पकडलं. विलास शिंदे यांच्या निधनाच्या 24 तासांतच ही घटना घडल्यानं वाहनचालकांना कायद्याचा धाकच उरला नाही, असं म्हटलं जातंय.