शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

पावसाळा सुरू झाल्यानंतरही अर्धा महाराष्ट्र तहानलेलाच; अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 06:15 IST

‘वायू’ चक्रीवादळामुळे जूनमधील मान्सूनचे आगमन लांबले. पण जूनच्या अखेरच्या आठवड्यात मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावले.

पुणे : जून महिन्यात वाट पाहायला लावणाऱ्या मान्सूनने गेल्या चार दिवसांत कोकण, मुंबईला अक्षरश: झोपडून काढले असले, तरी राज्याच्या अन्य भागांत अजूनही पावसाची मोठ्या प्रमाणावर प्रतीक्षा आहे़ कोकण, मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर, जालना, नागपूर, बुलडाणा, सातारा हे जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये अत्यंत कमी पाऊस पडला आहे़ मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांमध्ये अतिशय कमी पाऊस झाला असून, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही पाणी टंचाई तीव्र आहे़‘वायू’ चक्रीवादळामुळे जूनमधील मान्सूनचे आगमन लांबले. पण जूनच्या अखेरच्या आठवड्यात मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावले. कोकण, मुंबईत त्याने कहर केला़ मात्र, घाटावरून तो पुढे फारसा सरकला नाही़ मध्य महाराष्ट्रातील सर्व धरणांतील पाणीसाठा अजूनही वाढलेला नाही़ राज्यात १ जून ते ३ जुलैपर्यंत २१३ मिमी पाऊस झाला जो सरासरीच्या ११ टक्के इतका कमी आहे़ कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. पालघर (५७%), ठाणे (३७%) आणि मुंबई उपनगरात (७०%) सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर (-४६) व सांगली (-२७) जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाला. तेथे फक्त सरासरीच्या ३५% पाऊस आतापर्यंत पडला. धुळे (-१०), जळगाव (-२२), नाशिक (-२४ टक्के) हे जिल्हेही तसे कोरडेच आहेत.विदर्भातील ११ पैकी ७ जिल्ह्यांत अत्यंत कमी पाऊस पडला. विदर्भात आतापर्यंत पावसाची सरासरी १९६़२ मिमी असते जी प्रत्यक्षात १४७़६ मिमी म्हणजेच २५ टक्के कमी आहे़ यवतमाळ (-४८), वाशिम (-४०), वर्धा (-३५), अमरावती (-३७), अकोला(-२२), गडचिरोली (-३२), चंद्रपूर(-१६ टक्के) कमी पाऊस झाला आहे़जुलै उजाडूनही धरणे कोरडीमराठवाड्यात १ जून ते ३ जुलैदरम्यान १५५़१ मिमी सरासरी पाऊस पडतो़ यंदा १०८़४ मिमी पाऊसच पडला. त्यातही ६ जिल्ह्यांत अत्यंत कमी पाऊस झाला. जुलै उजाडूनही धरणे कोरडीच आहेत़ औरंगाबाद १२१़९ (-१३ ), बीड ९३़२(-३४), हिंगोली ८०़८ (-५८), जालना १४०़२ (-६), लातूर ११६़४ (-२३), नांदेड ९१़९ (-४७), उस्मानाबाद १०८़१(-२३), परभणी ११३़४ (-३२ टक्के) इतका पाऊस झाला.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र