सामूहिक बलात्कारानंतरही ती भोगते आहे मरण यातना

By Admin | Updated: May 17, 2017 00:22 IST2017-05-17T00:22:06+5:302017-05-17T00:22:06+5:30

तालुक्यातील बोईसर यादवनगर येथे राहणाऱ्या एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून या घटनेची चित्रफीत बनवून त्याआधारे ब्लॅकमेल करून वारंवार तिचे शारीरिक शोषण

Even after gang rape she is suffering from death | सामूहिक बलात्कारानंतरही ती भोगते आहे मरण यातना

सामूहिक बलात्कारानंतरही ती भोगते आहे मरण यातना

- हितेन नाईक, निखिल मेस्त्री । लोकमत न्यूज नेटवर्क

पालघर/नंडोरे : तालुक्यातील बोईसर यादवनगर येथे राहणाऱ्या एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून या घटनेची चित्रफीत बनवून त्याआधारे ब्लॅकमेल करून वारंवार तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या नराधमांची रवानगी कारागृहात झाली आहे. मात्र या पीडितेला शासनाच्या कोणत्याही योजनेतून मदत मिळालेली नाही. तीला घेऊन तिचा पती आजही मुंबई व गुजरातमधील एका रूग्णालयातून दुसऱ्या रूग्णालयात चकरा मारतो आहे. वारंवार झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे मानसिकदृष्ट्या खच्ची झालेल्या या पिडीतेने अ‍ॅसिड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिच्या विकारातील गुंतागुंत अधिकच वाढली आहे.
कांदिवली येथे राहणाऱ्या या तरु णीचे एका तरूणावर प्रेम होते. तेथून या दोघांनीही पळून जाऊन लग्न केले व बोईसर मधील यादवनगर येथे संसार थाटला. गेली दीड वर्षे ते आनंदाने राहत होते. तिचा पती हा जानेवारी महिन्यात उत्तरप्रदेशातील गावी गेला होता. त्यादरम्यान एके दिवशी ती बाजारात जात असतांना दोन - तीन अज्ञात इसमांनी तिला पळवून सामूहिक बलात्कार करून त्याची व्हिडीओ क्लिप बनविली व तिला सोडून दिले. त्यानंतर त्या क्लिपच्या धाकाने त्यांनी तिचे सतत शोषण केले. या नराधमांच्या धमक्या व सतत होत असलेल्या शोषणाला कंटाळून तिने अ‍ॅसिड प्रशान केले. स्थानिक रूग्णालयात योग्य ते उपचार उपलब्ध नसल्याने तिला वलसाड येथील कस्तुरबा दवाखान्यात नेण्यात आले अ‍ॅसिडमुळे अन्ननलिकेस इजा झाल्याचे सांगून तिला तीन दिवसांनी तेथील सिव्हिल हॉस्पिटलात दाखल करण्यास सांगितले.

आरोपींना कोठडी
संदीप यादव व शिवम यादव या आरोपीना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे या नराधमांची जामिनावर सुटका न होता त्यांच्याविरुद्धचा खटला जलद न्यायालयात चालवला जाऊन त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी जनभावना आहे.

Web Title: Even after gang rape she is suffering from death