सत्तेत असतानाही विखेंना त्रास होताच- माणिकराव ठाकरे

By Admin | Updated: July 9, 2017 13:02 IST2017-07-09T13:02:08+5:302017-07-09T13:02:27+5:30

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना काँग्रेस सत्तेत असतानाही त्रास होताच अशी कबुली देत मुख्यमंत्री व विखे यांची मैत्री पक्षविरहीत

Even after being in power, Vinakhna is in trouble - Manikrao Thakre | सत्तेत असतानाही विखेंना त्रास होताच- माणिकराव ठाकरे

सत्तेत असतानाही विखेंना त्रास होताच- माणिकराव ठाकरे

आॅनलाइन लोकमत
पारनेर, दि़ ९ - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना काँग्रेस सत्तेत असतानाही त्रास होताच अशी कबुली देत मुख्यमंत्री व विखे यांची मैत्री पक्षविरहीत असल्याचे काँग्रेस नेते व विधान परीषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सांगितले़
रविवारी पारनेर येथे एका कार्यक्रमाला ठाकरे आले होते़ तहसीलदार भारती सागरे यांनी ठाकरे यांचे स्वागत केले़ त्यानंतर ठाकरे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सध्याचे सरकार घरच्यासारखे वाटत असल्याचे सांगीतले होते़ विखे यांच्या या विधानाबाबत ठाकरे यांना छेडले असता ठाकरे म्हणाले, काँगे्रसची व राज्याची बाजू विखे सक्षमपणे मांडत आहेत़ त्यांना काँगे्रस सत्तेत असतानाही त्रास होताच़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची मैत्री राजकारणविरहीत आहे.

Web Title: Even after being in power, Vinakhna is in trouble - Manikrao Thakre