शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

साखरेपासूनही होणार इथेनॉल निर्मिती : १४५ लाख टन शिल्लकी साखरेचा प्रश्न मार्गी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 19:02 IST

देशात मोठ्या प्रमाणावर शिल्लकी साखर आहे...

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेला उठाव नसल्याने निर्यातीला मर्यादा केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्रीदर ३१०० रुपये प्रतिक्विंटल इतका

पुणे : केंद्र सरकारने साखरेपासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिल्याने देशातील तब्बल १४५ लाख टन शिल्लकी साखरेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. कारखान्यांना या व्यवहारातून नफा मिळणार नसला तरी, पडून राहिलेल्या साखरेपोटी द्यावे लागणार व्याज आणि इतर खर्चातून सुटका होणार आहे. हा अप्रत्यक्ष नफाच असल्याचे मत राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने सी मोलॅसिस (मळी), बी हेवी मोलॅसिस आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्याची परवानगी दिली आहे. देशात मोठ्या प्रमाणावर शिल्लकी साखर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेला उठाव नसल्याने निर्यातीला मर्यादा आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कारखाना महासंघाने साखरेपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी देण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्रीदर ३१०० रुपये प्रतिक्विंल इतका ठेवला आहे. त्यानुसारच मॉलॅसिसपासून तयार होणाºया इथेनॉलचा खरेदी दर ४३.७५, बी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर ५४.२७ आणि रसापासून तयार केलेल्या इथेनॉलचा खरेदीदर ५९.४८ रुपये असेल. मोलॅसिसपासून होणाऱ्या इथेनॉलमधे २९, बी हेवी मोलॅसिस पासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या १.८४ आणि उसाच्या रसापासून होणाऱ्या इथेनॉलदरात ३५ पैशांची वाढ झाली आहे.  साखर तयार करण्यासाठी कारखान्यांना काही ना काही खर्च करावा लागला आहे. साखरेपासून इथेनॉल करायचे म्हटल्यास त्यासाठी आठ ते साडेआठ रुपये प्रतिलिटर खर्च येईल. एक टन साखरेपासून ६०० लिटर इथेनॉल मिळेल. या सर्वबाबी पाहिल्यास कारखान्यांना फायदा होणार नाही. सध्या, देशातील ५३५ कारखान्यांच्या गोदामामधे १४५ लाख टन साखर शिल्लक आहे. साखरेपासून इथेनॉल निर्मिती केल्यास साखरेत अडकलेली भांडवली गुंतवणूक मोकळी होऊ शकेल. तसेच, गोदामात साखर शिल्लक राहिल्यास त्यापोटी व्याजही कारखान्यांना भरावे लागले. हा कारखान्यांना मिळणारा अप्रत्यक्ष नफाच असल्याचे नाईकनवरे म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेCentral Governmentकेंद्र सरकारbusinessव्यवसाय