इस्टेट एजंटला अटक
By Admin | Updated: July 4, 2016 02:27 IST2016-07-04T02:27:40+5:302016-07-04T02:27:40+5:30
विवाहितेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून एका इस्टेट एजंटला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे.

इस्टेट एजंटला अटक
नवी मुंबई : विवाहितेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून एका इस्टेट एजंटला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. पार्टीमध्ये झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत गुंगीचे औषध देवून अत्याचार केला. यानंतर धमकावून तीन वर्षे त्याने अत्याचार केल्याची तक्रार महिलेने केली आहे.
कोपरखैरणेतील महिलेने (३०) तिच्यावर सलग तीन वर्षे लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार कोपरखैरणे पोलिसांकडे केली आहे. २०१३ मध्ये एका पार्टीमध्ये सदर व्यक्तीसोबत तिची ओळख झाली होती.
यानंतर त्याने गुंगीचे औषध देवून बेशुद्ध अवस्थेत लैंगिक अत्याचार केल्याचे महिलेचे म्हणणे आहे. तर यावेळी काढलेल्या अश्लील छायाचित्रांच्या आधारे त्याने धमकावून सलग तीन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटलेले आहे.
याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात सावनकुमार वैश्य याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)