विक्रमगड तालुक्यात ५०० ठिकाणी गणरायाची स्थापना

By Admin | Updated: September 5, 2016 15:16 IST2016-09-05T12:36:54+5:302016-09-05T15:16:27+5:30

विक्रमगड पोलिस स्टेशन परिक्षेत्रात एकंदरित खाजगी ३८० तर सार्वजनिक गणेश मंडकडून १२० ‘बाप्पा’ची विधीवत स्थापना करणात आली आहे

Establishment of Ganapraya in 500 places in Vikramgad taluka | विक्रमगड तालुक्यात ५०० ठिकाणी गणरायाची स्थापना

विक्रमगड तालुक्यात ५०० ठिकाणी गणरायाची स्थापना

>-ऑनलाइन लोकमत
विक्रमगड , दि. 5 - सुखकर्ता, दुखहर्ता गणरायाची सोमवार आज सर्वत्र स्थापना करणात आली असून गणरायाच्या स्वागतासाठी संपूर्ण तालुका सज्ज झाला होता. यावर्षी  विक्रमगड पोलिस स्टेशन परिक्षेत्रात एकंदरित खाजगी ३८० तर सार्वजनिक गणेश मंडकडून १२० ‘बाप्पा’ची विधीवत स्थापना करणात आली आहे. 
 
घरगुती गणरायासोबतच सार्वजनिक गणेश मंडळे विविध ठिकाणी बसविणा-या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी विक्रमगड शहरासह संपूर्ण तालुका प्रत्येक गाव खेडात गणरायाचे आगमन आणि विसर्जन ही गणेशभक्तांसाठी एक मोठी पर्वणी असते. या उत्सवासाठी सर्व तयारीनिशी सज्ज झाल्याचा दावा प्रशासनाने देखील केला आहे. परवाने, होर्डिंग्ज आणि कायदा व सुव्यवस्था या विषयांवर समन्वय साधून सेवा-सुविधांची व्यवस्था स्थानिक प्रशासन बजावली जात आहे उत्सव साजरा करताना गणेशभक्त आणि मंडळांना कोणत्याही समस्या जाणवू नयेत, हा या सर्व तयारीचा उद्देश असतो. एकिकडे गणरायाच्या आगमनाचा उत्साह; तर दुसरीकडे यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे ग्रामीण भागातही आनंदाचे वातावरण  असून गणेशोत्सव थाटामाटात साजरा होत आहे.  
 
दरमान महागाईची झळ सोसूनही गणेशोत्सव साजरा केला जात आहे गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने अतिरिक्त पोलिस कुमक तैनात केल्याची माहितीही दिली.
 

Web Title: Establishment of Ganapraya in 500 places in Vikramgad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.