अतिरिक्त शिक्षकांप्रश्नी समिती स्थापन

By Admin | Updated: July 1, 2014 01:40 IST2014-07-01T01:40:19+5:302014-07-01T01:40:19+5:30

नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाने शालेय शिक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे.

Establishment of Additional Teachers Committee | अतिरिक्त शिक्षकांप्रश्नी समिती स्थापन

अतिरिक्त शिक्षकांप्रश्नी समिती स्थापन

>मुंबई : माध्यमिक शाळांना नवीन तुकडय़ा मंजूर करणो आणि त्या सुरू ठेवण्याच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाने शालेय शिक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त होईर्पयत शासनाने घेतलेल्या 20 नोव्हेंबर 2013च्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्यात आली आहे. याबाबतचा अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे.
 माध्यमिक शाळांच्या नवीन तुकडय़ांना मंजुरी देणो, त्या 
टिकविणो याबाबतचे निकष 
20 नोव्हेंबर 2013च्या शासन निर्णयाद्वारे पाठविण्यात आले होते. मात्र, यामध्ये सुधारणा करण्याची मागणी विविध संघटनांनी केली होती. त्यानुसार शासनाने शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीत राज्याचे शिक्षण विभाग आयुक्त हे सदस्य म्हणून तर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे संचालक हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. या समितीने आपला अहवाल त्वरित सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 
समितीचा अहवाल प्राप्त होईर्पयत माध्यमिक शाळांची संच मान्यता यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार करावी, असे अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Establishment of Additional Teachers Committee