नागपुरात ‘आॅटो हब’ स्थापन करा

By Admin | Updated: December 8, 2014 00:59 IST2014-12-08T00:59:00+5:302014-12-08T00:59:00+5:30

रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता आॅटोमोबाईल उद्योगामध्ये आहे. एका मोठ्या उद्योगामुळे १०० ते ३०० सहायक युनिटला काम मिळते. विदर्भात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी

Establish 'Auto Hub' in Nagpur | नागपुरात ‘आॅटो हब’ स्थापन करा

नागपुरात ‘आॅटो हब’ स्थापन करा

विजय दर्डा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : रोजगाराच्या संधी
नागपूर : रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता आॅटोमोबाईल उद्योगामध्ये आहे. एका मोठ्या उद्योगामुळे १०० ते ३०० सहायक युनिटला काम मिळते. विदर्भात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने नागपुरात आॅटोमोबाईल हब स्थापन करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खा.विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
खा. दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्य सरकारने नागपुरात आॅटो हब स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी आपण तीन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. यापूर्वीही तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांना पत्र लिहून या मुद्यांकडे त्यांचे लक्ष वेधले होते. मात्र तत्कालीन सरकार आणि मुख्यमंत्री प्रत्युत्तर देण्यावर अपयशी ठरले. शिवाय त्यांनी मला आश्वासन देण्यापलीकडे काहीच केले नाही, असे खा. दर्डा यांनी पत्रात म्हटले आहे. दर्डा यांनी म्हटले आहे की, सहायक युनिट नसल्याने आॅटो क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांनी विदर्भात गुंतवणूक करण्यास नकार दिला. पण महिन्द्र अ‍ॅण्ड महिन्द्र ट्रॅक्टर प्रकल्प यास अपवाद ठरला. हा प्रकल्प सहायक युनिटविना हिंगणा एमआयडीसी परिसरात यशस्वीरीत्या सुरू आहे. दरदिवशी पाच ट्रॅक्टर उत्पादनाच्या क्षमतेने सुरू झालेल्या या प्रकल्पात सध्या दरदिवसाला २५० ट्रॅक्टरचे उत्पादन करण्यात येत असल्याचे दर्डा यांनी पत्रात नमूद केले आहे.
राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे महाराष्ट्रातील अनेक आॅटोमोबाईल कंपन्यांनी
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याशिवाय ३० ते ४० आॅटोमोबाईल उद्योजकांना (दुचाकी आणि तीनचाकी) आपला विस्तारीकरण प्रकल्प विदर्भात सुरू करण्याची विनंती केली होती. त्यापैकी बहुतांश जणांनी आॅटो हब स्थापनेसाठी होकार दिला आहे. लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा (बाबूजी) उद्योगमंत्री असताना त्यांनीसुद्धा विदर्भात आॅटो उद्योग सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. त्याचाच परिणाम म्हणून अशोक लेलँडने ट्रक उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. पण कंपनीने भंडारा जिल्ह्यातील वरठी येथे केवळ स्टॉक यार्ड सुरू केल्याचा उल्लेख खा. दर्डा यांनी पत्रात केला आहे.

Web Title: Establish 'Auto Hub' in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.