भाजप आणि भ्रष्टाचाराचं समीकरण- नारायण राणे
By Admin | Updated: May 26, 2016 20:22 IST2016-05-26T20:22:30+5:302016-05-26T20:22:30+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

भाजप आणि भ्रष्टाचाराचं समीकरण- नारायण राणे
ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. 26- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी मोदी सरकारवर टीका केली आहे. केंद्रातल्या सत्तेत भाजपनं दोन वर्ष पूर्ण केल्यानंतर राज्यभरात केलेल्या जल्लोषाचा नारायण राणेंनी निषेध व्यक्त केला आहे.
भाजप आणि शिवसेनेच्या राजवटीत प्रशासनात सावळागोंधळ असून, भाजप आणि भ्रष्टाचार हे समीकरण झाल्याचं म्हणत नारायण राणेंनी युती सरकारवर टीकास्त्र सोडलं. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारमध्ये शोधल्यास भ्रष्टाचाराची अनेक उदाहरणं सापडली, अशी टीका नारायण राणेंनी मोदी सरकारवर केली आहे. भाजप म्हणतं भ्रष्टाचार नाही, मग केलेल्या जाहिरातींसाठीचा पैसा कुठून आला, हा भ्रष्टाचार नाही तर काय, असं नारायण राणेंनी भाजपवर निशाणा साधला.
भाजप आणि भ्रष्टाचार हे समीकरण झालं आहे. सरकारनं एफएसआय वाढवून हजारो कोटींची उलाढाल केली आहे. त्या उलाढालीतून आलेला पैसा कोणाच्या खिशात गेला, असं वक्तव्य करत नारायण राणेंनी भाजपवर कुरघोडी केली. माझं सध्या सिंधुदुर्गाच्या विकासाकडे लक्ष्य असल्याचंही यावेळी नारायण राणेंनी आवर्जून सांगितलं आहे.