शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

अनधिकृत बियाण्यांमुळे पर्यावरणाचा -हास, आठ कंपन्या एसआयटीचे लक्ष्य : अवैध उत्पादन, विक्री करणा-या अनेक राज्यांमध्ये टोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 21:04 IST

बीटी बियाण्यांमध्ये विनापरवानगी तणनाशकाला सहनशील करणा-या जनुकांचा वापर करणा-या आठ बियाणे कंपन्या विशेष तपास (एसआयटी) पथकाचे लक्ष्य राहणार आहे.

अमरावती : बीटी बियाण्यांमध्ये विनापरवानगी तणनाशकाला सहनशील करणा-या जनुकांचा वापर करणा-या आठ बियाणे कंपन्या विशेष तपास (एसआयटी) पथकाचे लक्ष्य राहणार आहे. या कंपन्यांविरोधात पाराशिवणी येथे गुन्हा दाखल आहे. त्या कागदपत्रांची छाननी करून शासनाला अहवाल सादर होणार आहे. या बियाण्यांमुळे पर्यावरणाचा -हास होत आहे. अशाप्रकारे बियाण्यांची विक्री करणा-या टोळ्या अनेक राज्यांमध्ये कार्यरत असल्याचा शासनाचा अंदाज आहे. त्या दृष्टीेनेदेखील एसआयटी तपास करणार आहे.बीटी कापसाच्या बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशील असलेले जनुक वापरून अवैध विक्री होत असल्याची बाब शासनाच्या निर्दशनात आली. एखाद्या बियाणे कंपनीला केंद्र शासनाने बियाणे अधिनियम १९६६ च्या तरतुदीअंतर्गत अधिसूचित असलेले अथवा नसलेले, परंतु संशोधित जनुक परिवर्तित वाण व्यापारी तत्त्वावर उत्पादित करावयाचे असल्यास, प्रचलित कार्यपद्धतीनुसार अशा कंपनीला जेनेटिक इंजिनीअरिंग अपरायझल कमिटीकडून परवानगी आवश्यक आहे. त्यानंतरच महाराष्ट्रात सदर वाण विकण्यासाठी कृषी आयुक्तालयाकडून परवानगीची कार्यवाही करण्यात येते. राज्यात सद्यस्थितीत बीटी कापूस बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशील असलेले जनुक असलेल्या बियाणे विक्रीला कमिटीने मान्यता दिलेली नाही. मात्र, अशा प्रकारचे उत्पादन अनेक कंपन्यांद्वारा राज्यासह देशभरात सुरू आहे. या बियाण्यांची अवैध विक्री, साठवणूक सुरू असून, अशा प्रकारचा अपराध करणाºया टोळ्या अनेक राज्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याने आता शासनाद्वारा या कंपन्यांच्या मुसक्या आवळण्यात येणार आहेत. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठीच एसआयटीचा उतारा शासनाने शोधला आहे. या कमिटीच्या शिफारशींवरून आता कारवाई होणार आहे.

एकाही बियाणे कंपनीला परवानगी नाही-जनुक परिवर्तित पिकांच्या चाचण्या घेण्यास बियाणे कंपन्यांनी परवानगी मागितल्यामुळे शासनाने १० सदस्यीय राज्य सल्लागार समिती स्थापित केली. देशात सध्या जनुक परिवर्तित पीक म्हणून सन २००२ मध्ये बीजी-१ व सन २००६ मध्ये बीजी-२ या बीटी कपाशीच्या वाणाला राज्यात बियाणे विक्रीला परवानगी आहे. मात्र, केंद्र शासनाने बियाणे अधिनियम १९६६ अन्वये जनुक परिवर्तित वाण उत्पादित करण्याची व विकण्याची परवानगी समितीने एकाही कंपनीला दिलेली नसताना काही बियाणे कंपन्यांनी महाराष्ट्रसह अन्य राज्यातदेखील अवैधपणे बियाणे विक्रीचा गोरखधंदा सुरू केल्याने पर्यावरणाचीही हानी होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी