शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गडकरीजी, 'तो' ४०० वर्ष जुना वटवृक्ष वाचवा; आदित्य ठाकरेंची पत्राद्वारे विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 15:17 IST

वटवृक्षाच्या जतनासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र

सांगली: तब्बल ४०० वर्षे जुन्या वटवृक्षाला वाचवण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पुढे सरसावले आहेत. वटवृक्ष कापला जाऊ नये, यासाठी ठाकरेंनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींना पत्र लिहिलं आहे. रत्नागिरी-कोल्हापूर-मिरज-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ साठी वटवृक्ष तोडावा लागणार आहे. मात्र याला स्थानिकांकडून वाढता विरोध सुरू आहे. वटवृक्ष वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी चिपको आंदोलनदेखील सुरू केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी गडकरींना पत्र लिहून वटवृक्ष न कापता पर्यायी जागेवरून रस्त्याचं काम करण्याचं विनंती केली आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ मिरज ते पंढरपूर दरम्यान भौसे येथून जातो. गावातील गट क्रमांक ४३६ इथं यलम्मा देवीचं मंदिर असून त्यासमोर ४०० वर्षे जुना वटवृक्ष आहे. या वटवृक्षाचा विस्तार ४०० चौरस मीटर इतका आहे. हा वटवृक्ष ऐतिहासिक ठेवा असून तो वटवाघूळ आणि इतर दुर्मिळ पक्षांसाठी नैसर्गिक निवासस्थानदेखील आहे, असं आदित्य यांनी गडकरींना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे. वटवृक्षाचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन संबंधित जागेवरील महामार्गाचं संरेखन काही प्रमाणात बदलून वटवृक्षाचं जतन करण्याची विनंती आदित्य यांनी केली आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी महामार्गाचं काम अतिशय वेगानं सुरू असल्याबद्दल गडकरी यांचं कौतुकदेखील केलं आहे. या महामार्गाचा परिसरातल्या शेतकरी आणि नागरिकांना फायदा होईल. त्याबद्दल आपला आभारी असल्याचं ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे. आता या पत्राला गडकरींकडून नेमकं काय उत्तर मिळणार आणि वटवृक्षाचं जतन होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. चारशे वर्षे जुना वटवृक्ष वाचवण्यासाठी सांगलीतील वृक्ष प्रेमींनी चिपको आंदोलन सुरू केलं आहे. आजपर्यंत या राष्ट्रीय महामार्गासाठी रस्त्यावरील अनेक झाडं तोडली गेली. त्याला कोणी विरोध केला नाही. मात्र ४०० वर्षांहून अधिक जुना वटवृक्ष असल्यानं त्याच्या बचावासाठी ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमी सरसावले आहेत. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई परिवारानं वटवृक्ष तसाच ठेवून त्याच्या शेजारून रस्ता करावा, अशी मागणी करत आंदोलनाची हाक दिली आहे. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेNitin Gadkariनितीन गडकरी