कुख्यात गुंडाचा भाजपामध्ये प्रवेश

By Admin | Updated: January 10, 2017 19:32 IST2017-01-10T19:31:59+5:302017-01-10T19:32:37+5:30

निवडणुका जवळ आल्या की भाजपमध्ये जणू गुंडांना प्रवेश देण्याची चढाओढच सुरु होते. पुण्यातील मुळशी येथील कुख्यात गुंड विठठ्ल शेलार याने

Entry into the notorious gang of BJP | कुख्यात गुंडाचा भाजपामध्ये प्रवेश

कुख्यात गुंडाचा भाजपामध्ये प्रवेश

>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 10 - निवडणुका जवळ आल्या की भाजपामध्ये जणू गुंडांना प्रवेश देण्याची चढाओढच सुरु होते. पुण्यातील मुळशी येथील कुख्यात गुंड विठठ्ल शेलार याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.  पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत आणि मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या पुढाकारातून शेलारचा भाजपा प्रवेश पार पडला. 
 
विठठ्ल शेलार याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.  शेलारच्या टोळीविरोधात वर्ष 2014 मध्ये  ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का)कारवाई केली होती. जवळपास 3 वर्ष तो तुरूंगात होता. 4 महिन्यांपूर्वी त्याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
 
गेल्या आठवड्यात 30 डिसेंबर रोजी शेलारचा भाजपा प्रवेश झाला.  सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकींचे वारे वाहत आहेत.  या पार्श्वभूमीवर भाजपाने शेलारला पक्षात घेऊन पवित्र केल्याची चर्चा आहे. पक्षप्रवेशाच्या निमित्ताने शेलारला भोर-वेल्हा-मुळशी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले आहे.
 

Web Title: Entry into the notorious gang of BJP