घरात घुसून अज्ञात मारेक-यांनी बँक व्यवस्थापकाची गळा चिरून केली हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:36 IST2017-09-10T01:34:56+5:302017-09-10T01:36:23+5:30
घरात घुसून अज्ञात मारेक-यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखाव्यवस्थापकाची गळा चिरून निर्घृण हत्या केली. सातारा परिसरातील छत्रपतीनगरात शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.
_201707279.jpg)
घरात घुसून अज्ञात मारेक-यांनी बँक व्यवस्थापकाची गळा चिरून केली हत्या
औरंगाबाद : घरात घुसून अज्ञात मारेक-यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखाव्यवस्थापकाची गळा चिरून निर्घृण हत्या केली. सातारा परिसरातील छत्रपतीनगरात शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.
जितेंद्र नारायण होळकर (४७) असे मृताचे नाव आहे. मूळचे कांबी (ता. शेवगाव, जि. अहमदनगर) येथील रहिवासी असलेले होळकर बँकेच्या शेकटा (ता. पैठण) शाखेत कार्यरत होते. त्यांची पत्नी भाग्यश्री या जिल्हा परिषदेत कार्यालयीन अधीक्षक आहेत. त्यांची मोठी मुलगी प्रवरासंगम (जि.नगर) येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेते. तर, नववीत शिकणारा पंधरा वर्षांचा मुलगा आणि होळकर पती-पत्नी छत्रपतीनगरात राहतात.
शुक्रवारी मध्यरात्री होळकर यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून मुलासह वेगळ््या खोलीत झोपलेल्या भाग्यश्री यांना जाग आली. त्यांनी पतीच्या खोलीकडे धाव घेतली मात्र, त्यांच्याच खोलीचा दरवाजा कुणीतरी बाहेरून लावला होता.
पाठक यांनी भाग्यश्री यांच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि ते सर्वजण शेजारच्या खोलीत डोकावले तेव्हा जितेंद्र यांची गळा चिरून हत्या केल्याचे त्यांना दिसले.मध्यरात्री ही घटना घडाल्याने विभागात एकच खळबळ उडाली.