शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

"Enough is Enough! आता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी...", संजय राऊतांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 12:29 IST

Sanjay Raut : राष्ट्रपती राजवट लावण्याची धमकी आम्हाला देऊ नका, ईडी, सीबीआय असल्या धमक्यांना शिवसेना घाबरत नाहीत. बायकांना पुढे करुन शिकंड्याचा खेळ भाजप करत आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.

मुंबई : राज्यात हनुमान चालीसा पठणावरून सुरू झालेल्या वादात खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी उडी घेतली असून, आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीस पठण करण्याचे आव्हान दिले. यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले. यावरून मातोश्री बाहेर जोरदार राडा रंगला. तसेच, राणा दाम्पत्याच्या घराबाहेरही शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. 

दरम्यान, यावरून शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला. महाराष्ट्रात शिवसेनेला आव्हान देण्यासाठी सात जन्म घ्यावे लागतील, असे प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितले. त्यानंतर हनुमान चालीसा पठणावरुन सुरु झालेल्या गोंधळावर संजय राऊत यांनी एख ट्विट केले आहे. यामध्ये ते म्हणाले, ""Enough is Enough! आता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी... जय महाराष्ट्र!!"   

'बायकांना पुढे करुन शिकंड्याचा खेळ भाजप करतंय'सरकार आमचे असल्याने आमचे हात बांधले आहेत. माझे आत्ताच मुख्यंत्र्यांशी बोलणे झाले आहे. राष्ट्रपती राजवट लावण्याची धमकी आम्हाला देऊ नका, ईडी, सीबीआय असल्या धमक्यांना शिवसेना घाबरत नाहीत. बायकांना पुढे करुन शिकंड्याचा खेळ भाजप करत आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे. तसेच, राणा दाम्पत्याने लायकीत राहावे, कोण आहात तुम्ही. तुम्ही आमच्या घरात शिरताय, मग शिवसैनिक कसा गप्प बसेल. शिवसैनिकांचा हा उत्स्फुर्त प्रतिसाद आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले. 

'तुम्हालाही घरे आहेत हे लक्षात ठेवा'कायदा आणि सुव्यवस्थे बाबात उपयोजन करण्यासाठी तुमचे सल्ले ऐकण्याइतकं महाराष्ट्राला भिकारीपण आलं नाही. मातोश्रीत घुसण्याची हिम्मत नाही, ते बदनामी करत आहेत. मग, शिवसैनीक चिडून तुमच्या घरांपर्यंत शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल, तर तुम्हालाही घरं आहेत हे लक्षात ठेवा, असा इशाराच राऊत यांनी दिला. शिवसैनिकांवर आता कुणाचंही कंट्रोल नाही, अजून काही सुरुवात झाली नाही. दोन दिवसांत मुंबईत जे काही झाली तो फक्त शिवसैनिकांच्या भावनेचा उद्रेक नाही, सामान्य भावनेचाही उद्रेक आह, असे म्हणत संजय राऊत यांनी शिवसैनिकांच्या आक्रमकतेचं समर्थन केलं आहे.  

'भाजप त्यांना मोठं करतंय'राणा यांना मोठं आम्ही करत नाही. कालपर्यंत हिंदूत्वावर हल्ले करणारे हे बंटी आणि बबली आहे यांना भाजप किंवा आता नव हिंदूत्ववादी ओवेसी आलेत, ते यांना मोठं करत आहेत. त्यांचेच हात जळणार आहेत. हनुमान चालीसा आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही वाचू, बाहेरचे व्यक्ती येऊन शिकवणार का, असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाRavi Ranaरवी राणाnavneet kaur ranaनवनीत कौर राणाMumbaiमुंबई