शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

येत्या दोन वर्षांत सीएनजीचा विस्तार करणार - धर्मेंद्र प्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2017 21:50 IST

जगात इंधनयुक्त वायूचा वापर हा २४ टक्के होतो, तर भारतात हे प्रमाण ६ टक्के आहे.

ऑनलाइन लोकमत/मनोहर कुंभेजकर

मुंबई, दि. 1 - जगात इंधनयुक्त वायूचा वापर हा २४ टक्के होतो, तर भारतात हे प्रमाण ६ टक्के आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त आणि स्वस्त असलेल्या सीएनजीचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने पुढाकार घ्यावा. आजही अनेक मुंबईकराकडे एलपीजी गॅस सिलिंडर नाही. त्यामुळे येत्या दोन वर्षांत मुंबईसह देशात सीएनजी आणि एलपीजीचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पावभाजीच्या गाडीवर सीएनजीयुक्त पावभाजी मिळेल, असा फलक पावभाजी गाडीवाला अभिमानाने सांगेल, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) धर्मेंद्र प्रधान यांनी आज बीकेसी येथे केले. मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गावर ७०० किमी नैसर्गिक वायूयुक्त पाईपलाईन टाकण्यात येणार असल्यामुळे येथे विकसित होणाऱ्या शहरांचा विकास आणि रोजगार निर्मिती होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पर्यावरण स्नेहीइंधनाच्या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा प्रयत्नाचा एक भाग म्हणून महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल)ने मेसर्स इको फ्युएल (लोवाटो, इटलीचे भारतीय भागीदार) यांच्या भागीदारीतून सीएनजी इंधनयुक्त दुचाकी बाजारात आणल्या आहेत. सीएनजी इंधनयुक्त दुचाकीचे बीकेसीतील महानगर गॅस लिमिटेड कार्यालयासमोर अनावरण झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री आणि उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे, स्थानिक खासदार पूनम महाजन, एमजीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. सी. त्रिपाठी, एमजीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव माथूर, संचालक राजेश पांडे, मुंबईच्या उपमहापौर अलका केरकर, भाजपा जिल्हा अध्यक्ष सुहास अडिवडेकर, मुंबई भाजपा सरचिटणीस अमरजित मिश्रा, शिवप्रसाद भिडे, अमरजीत सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर २५ सीएनजी किटयुक्त लोवोटा दुचाकी स्कूटींना त्यांनी झेंडा दाखवला. धर्मेंद्र प्रधान पुढे म्हणाले की, या सीएनजीयुक्त दुचाकीचा फायदा मुंबई महानगर प्रदेशातील ३६ लाखांपेक्षा जास्त दुचाकी वाहनांना होऊ शकेल. या महानगरातील सीएनजीच्या वाहनांची संख्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक वाढली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. खासदार पूनम महाजन यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे सीएनजी किट बसवलेल्या दुचाकी वाहनधारकाना काही सूट देता येईल का, याचा विचार एमजीएलने व गेलने करावा अशी सूचना त्यांनी यावेळी केली.शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले की, दिल्लीनंतर मुंबई उपनगरात हा वेगळा उपक्रमाची भर पडली आहे. जे विद्यार्थी अशा ग्रीन एनर्जी प्रणालीचा वापर आपल्या दुचाकी वाहनांमध्ये करतील त्या पर्यावरण रक्षक विद्यार्थ्याना अंतिम परीक्षेत जास्त गुण देण्याचा शिक्षण विभाग निश्चित विचार करेल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.त्यामुळे स्पर्धात्मक परीक्षेत देखील या वाढीव गुणांचा त्यांना फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही प्रणाली किफायतशीर आणि स्वस्त असून, पेट्रोलला एका लिटरसाठी १.२० पैसे खर्च तर वायूवर आधारित या इंधनाच्या एका लिटरसाठी ६० पैसे खर्च येतो. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या या प्रणालीचा प्रसार मुंबईसह महाराष्ट्रात होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक प्रदीप भिडे यांनी केले. असे आहे दुचाकी किट या किटमध्ये प्रत्येकी १.२ लिटरचे सीएनजी सिलिंडर असून, सुमारे ०.६० रुपये प्रति किमी प्रत्येकी भरण्यावर सुमारे १२० ते १३० किमी दुचाकी वाहन चालू शकते.