इंग्रजी शाळांमध्ये मराठी असावे - राज
By Admin | Updated: November 30, 2014 01:48 IST2014-11-30T01:48:59+5:302014-11-30T01:48:59+5:30
ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी इंग्रजी शाळांविषयी केलेल्या वक्तव्यावर राज यांनी सावध प्रतिक्रिया देत इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकविले जाणो आवश्यकच आहे.
इंग्रजी शाळांमध्ये मराठी असावे - राज
नाशिक : ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी इंग्रजी शाळांविषयी केलेल्या वक्तव्यावर राज यांनी सावध प्रतिक्रिया देत इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकविले जाणो आवश्यकच आहे. तसेच मराठी शाळांमध्येही दर्जेदार मराठी शिकविले तर इंग्रजी शाळांमध्ये शिकण्याचा ओढा आपोआप कमी होईल, असे प्रतिपादन राज ठाकरे यांनी केले.
नाशिक शहराला देशात गार्डन सिटी म्हणून नावारूपास आणण्याचा आपला प्रयत्न असून, त्यादृष्टीने महिंद्रा आणि रिलायन्स उद्योग समूहाशी आपले बोलणो सुरू आहे. त्यासाठी शहरातील शिवाजी उद्यान, फाळकेस्मारक, कुसुमाग्रज उद्यान तसेच गोदापार्क येथील जागेचा वापर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी शनिवारी स्पष्ट केल़े दरम्यान टोलबाबत ते म्हणाले, गरज नसताना नागरिकांना भरावे लागणारे राज्यातील 44 टोल आम्ही आंदोलन केल्यानंतर बंद केले. जगभरात आहेत, त्यानुसार आपल्याकडेही कॅशलेस टोलनाके असावेत. टोल भरणा:या नागरिकांना केवळ पावती मिळावी अन् त्याच्या खात्यातून नंतर पैसे कपात केली जावे. टोलवर जमा होणा:या रोकडमुळे अनेक समस्या निर्माण होतात. शिवाय रोख पैसे देण्याचा प्रश्नच येत नसल्याने कॅशलेस टोलनाके असतील तर या टोलच्या प्रक्रियेत अधिकाधिक पारदर्शीपणा येईल. (प्रतिनिधी)