शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी भारतातील तिसऱ्या क्रमांकाची शाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 02:51 IST

बी.ए. आणि बी.एससीनंतर इंजिनिअरिंगच्या पदवीसाठी विद्यार्थ्यांनी सर्वाधिक प्रवेश घेतल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते

- सीमा महांगडे मुंबई : राज्यात इंजिनिअरिंगच्या ४३ टक्के जागा रिक्त राहिल्या असून आॅल इंडिया सर्व्हे आॅफ हायर एज्युकेशनच्या सर्वेक्षणानुसार, इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी ही विद्यार्थ्यांची पसंती असलेली देशातील तिसºया क्रमांकाची शाखा असल्याचे समोर आले आहे.बी.ए. आणि बी.एससीनंतर इंजिनिअरिंगच्या पदवीसाठी विद्यार्थ्यांनी सर्वाधिक प्रवेश घेतल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. २०१७-१८ च्या अहवालानुसार देशात बॅचलर आॅफ इंजिनिअरिंगसाठी १८.२ लाख, तर बॅचलर आॅफ टेक्नोलॉजीसाठी २१.१९ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. इंजिनीअरिंग आणि टेक्नोलॉजीच्या आणखी १९ उपशाखा आहेत. त्यातही मेकॅनिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग या पाच सगळ्यात जास्त मागणी असणाºया उपशाखा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.देशात १.९२ लाख विद्यार्थी इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नोलॉजीचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत, तर ३८,७१४ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. साठी प्रवेश घेतला आहे. पीएच.डी.साठी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे सर्वात जास्त ५,३४९ विद्यार्थी आहेत. त्यानंतर कॉम्प्युटर इंजिनीअरिंगचा क्रमांक लागतो. त्यासाठी ५,२३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पदव्युत्तर शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक ३५,९६७ इतकी आहे.पॉलिटेक्निकच्या प्रवेशात महाराष्ट्र दुसरापॉलिटेक्निकसाठी प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्र देशात दुसºया स्थानी असून त्यांची संख्या २ लाख इतकी आहे, तर ३ लाख ४९ हजार विद्यार्थ्यांसह तामिळनाडू प्रथम क्रमांकावर आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानEducationशिक्षण