शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनियरिंग प्रवेश अर्ज भरण्यासाठी २३ तारखेपर्यंत मुदत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2018 16:14 IST

इंजिनियरिंग प्रवेशासाठी १९ जून हा प्रवेश अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.

नागपूर : यावर्षी इंजिनिंयरिग प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरताना सोबत जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जोडण्याची अट घालण्यात आली होती. यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला होता. आ. परिणय फुके यांनी हा प्रश्न शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे मांडला. तावडे यांनी याची दखल घेत इंजिनियरिंगचे प्रवेश अर्ज भरण्याची मुदत १९ जून वरून वाढवून २३ जून केली आहे. इंजिनियरिंग प्रवेशासाठी १९ जून हा प्रवेश अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. एवढ्या कमी वेळात ओबीसी विद्यार्थी जात पडताळणी प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र कसे सादर करतील, असा प्रश्न ओबीसी विद्यार्थ्यांच्या पालकांनी सोशल मिडियावर उपस्थित केला होता. तशा पोस्टही व्हायरल झाल्या होत्या. आ. परिणय फुके यांनी असाच एक मॅसेज सोशल मिडियावर पाहिला व तो लगेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पाठवून या प्रश्नावर मार्ग काढण्याची विनंती केली. जात पडताळणी प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया ही किचकट असून, बराच वेळ घेणारी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशसाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी विनंतीही आ. फुके यांनी शिक्षणमंत्री तावडे यांना केली. याची दखल घेत शिक्षणमंत्री तावडे यांनी इंजिनियरिंगसाठी आॅनलाईन  प्रवेश अर्ज सादर करण्याची मुदत २३ जूनपर्यंत वाढविण्यात येईल व आवश्यक प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी वाढीव सात दिवस दिले जातील, असे आश्वस्त केले. यासंबंधीची अधिसूचनाही त्वरित काढली जाईल, असेही स्पष्ट केले. आ. फुके यांनी शिक्षणमंत्र्यांच्या या भूमिकेचे स्वागत करीत विद्यार्थ्यांच्या पालकांनी लवकरात लवकर जात पडताळणी व नॉन क्रिमिलियरसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकMaharashtraमहाराष्ट्र