इंजिनीअर पती आणि डॉ. पत्नीची मुलीसह आत्महत्या, नवी मुंबईत खळबळ

By Admin | Updated: April 23, 2017 16:51 IST2017-04-23T16:23:28+5:302017-04-23T16:51:26+5:30

इंजिनिअर पती आणि डॉक्टर पत्नीने आपल्या 16 वर्षीय मुलीसह गळफास आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज नवी मुंबईतील कामोठे

Engineer husband and Dr. Suicide with wife's girls, excitement in Navi Mumbai | इंजिनीअर पती आणि डॉ. पत्नीची मुलीसह आत्महत्या, नवी मुंबईत खळबळ

इंजिनीअर पती आणि डॉ. पत्नीची मुलीसह आत्महत्या, नवी मुंबईत खळबळ

>ऑनलाइन लोकमत
नवी  मुंबई, दि. 23 -  इंजिनीअर पती आणि डॉक्टर पत्नीने आपल्या 16 वर्षीय मुलीसह गळफास आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज नवी मुंबईतील कामोठे परिसरात घडली. उच्चशिक्षित कुटुंबाने आत्मह्त्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
 
इंद्रजीत दत्ता (50), डॉ. जस्मिन पटेल आणि  ओशीन अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. जस्मिन पटेल या डॉक्टर असून त्या कामोठे येथील तिरुपती इमारतीत स्वतःच क्लिनिक चालवत होत्या मात्र स्वतः आजारपणाने ग्रासल्याने त्या नैराश्याने ग्रासलेल्या होत्या, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच त्यांचे पती हे बऱ्याच वर्षांपासून घरीच असल्याने त्यांना देखील आपल्या पत्नीच्या आजारपणाच्या व स्वतः कुठे कामाला नसल्याने ते मानसिक तणावात होते व त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला व आपल्या मागे आपल्या १५ वर्षाच्या मुलीचा जागून काय उपयोग या तणावात त्यांनी तिला देखील आत्महत्या पत्करायला लावली . या प्रकारानंतर कामोठे शहरात एकच खळबळ उडालेली असून, पोलीस या बाबत अधिक तपास करत आहेत.
 
  मृतदेहांजवळ पोलिसांना दोन चिठ्ठ्या आढळल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जस्मिन पटेल यांनी आपण आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.  "गेल्या बऱ्याच काळापासून आजारी असल्याने मला जगण्यात अर्थ वाटत नाही. तसेच माझ्या मागे मुलीला  एकची सोडण्याची इच्छा नाही. त्यामुळे मी माझ्या मुलीसह आत्महत्या करत आहे. मृत्युनंतर आमचे मृतदेह विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी के.ई.एम. ला दान करण्यात यावे," असे जस्मिन यांनी आपल्या चिठ्ठीत म्हटले आहे. 
 
तर इंद्रजित दत्ता यांच्या मृतदेहाशेजारूनही चिठ्ठी मिळाली असून, पत्नी आणि मुलीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पाहिल्यानंतर मलाही जगण्यात रस राहिलेला नाही. त्यामुळे मीही आत्महत्या करत आहे, असे त्यांनी त्या चिठ्ठीत म्हटले आहे. 
 
  

Web Title: Engineer husband and Dr. Suicide with wife's girls, excitement in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.