बदलापूर-अंबरनाथदरम्यान मालगाडीचे इंजिन फेल, म.रे.विस्कळीत

By Admin | Updated: August 8, 2015 08:44 IST2015-08-08T08:41:49+5:302015-08-08T08:44:38+5:30

दलापूर- अंबरनाथ स्थानकांदरम्यान मालगाडीचे इंजिन फेल झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Engine lost in Badlapur-Ambernath flight, M.R. disrupted | बदलापूर-अंबरनाथदरम्यान मालगाडीचे इंजिन फेल, म.रे.विस्कळीत

बदलापूर-अंबरनाथदरम्यान मालगाडीचे इंजिन फेल, म.रे.विस्कळीत

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ८ -  बदलापूर- अंबरनाथ स्थानकांदरम्यान मालगाडीचे इंजिन फेल झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडली.  कर्जतहून मुंबईच्या दिशेने येणा-या मालगाडीचे इंजिन बदलापूर- अंबरनाथ दरम्यान बंद पडले. त्यामुळे मागून सीएसटीच्या दिशेने येणा-या गाड्याही अडकून पडल्या असून प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

मध्य रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून कल्याणहून नवे इंजिन आणून ही मालगाडी सुरू करण्यात येईल व लोकलचा खोळंबा दूर होईल असे सांगण्यात येत आहे. मात्र या सर्व प्रक्रियेस नेमका किती कालावधी लागेल हे अद्याप स्पष्ट झालेले नसून कामावर निघालेल्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Engine lost in Badlapur-Ambernath flight, M.R. disrupted