इंजिन गेले डबे सोडून!
By Admin | Updated: November 17, 2016 03:41 IST2016-11-17T03:41:55+5:302016-11-17T03:41:55+5:30
धावत्या रेल्वेचे इंजिन डबे सोडून पुढे गेल्याचा धक्कादायक प्रकार

इंजिन गेले डबे सोडून!
पुणे : धावत्या रेल्वेचे इंजिन डबे सोडून पुढे गेल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला.
पुणे - अमरावती ही गाडी बुधवारी दुपारी साडेतीन वाजता पुणे स्टेशनहून सुटली. सुमारे अर्ध्या तासाने उरुळी कांचनजवळील सहजपूर येथे पोहोचली, त्यावेळी प्रवाशांना जोरदार झटका बसल्याचे जाणवले. काही मिनिटातच वेग कमी होऊन गाडी थांबली. काय झाले म्हणून प्रवाशांनी उतरून पाहिले असता गाडीचे इंजिनच पुढे गेले होते. डबे तसेच मागे राहिले होते. (प्रतिनिधी)