इंजिन घसरले

By Admin | Updated: October 20, 2014 05:27 IST2014-10-20T05:27:07+5:302014-10-20T05:27:07+5:30

गेल्या विधानसभा निवडणुकीत १३ जागा जिंकणाऱ्या मनसेचे इंजिन यंदा मात्र रुळावरून घसरले आहे. मनसेचे सर्व विद्यमान आमदार पराभूत झाले आहेत.

Engine collapsed | इंजिन घसरले

इंजिन घसरले

गौरीशंकर घाळे, मुंबई
मुंबई : गेल्या विधानसभा निवडणुकीत १३ जागा जिंकणाऱ्या मनसेचे इंजिन यंदा मात्र रुळावरून घसरले आहे. मनसेचे सर्व विद्यमान आमदार पराभूत झाले आहेत. मुंबईसह नाशिक आणि पुणे या मनसेच्या प्रभावक्षेत्रात पक्षाची कामगिरी निराशाजनक आहे. शरद सोनावणेंच्या रूपात जुन्नरच्या एकमेव जागेवर मनसेला विजय मिळाला.
मनसेने राज्यात २१९ ठिकाणी उमेदवार दिले. स्वत: राज ठाकरे यांनी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई, पुणे या सर्वच ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. विकासाची ब्लू प्रिंट सादर करीत मतांचा जोगवा मागितला. थेट मोदींसह सर्वच पक्षांवर केलेली टीकाही मनसेला तारू शकली नाही. बाळा नांदगावकर,
नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे, वसंत गीते या दिग्गजांचा पराभव पक्षासाठी मोठा धक्का आहे.

Web Title: Engine collapsed