वीज दर कपातीचे ऊर्जामंत्र्यांचे संकेत

By Admin | Updated: January 13, 2015 03:03 IST2015-01-13T03:03:00+5:302015-01-13T03:03:00+5:30

विजेच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ, वीज गळतीमुळे होत असलेले नुकसान यामुळे विजेच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा भुर्दंड ग्राहकांना बसतो आहे.

Energy indicator of power tariff cut | वीज दर कपातीचे ऊर्जामंत्र्यांचे संकेत

वीज दर कपातीचे ऊर्जामंत्र्यांचे संकेत

नागपूर : विजेच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ, वीज गळतीमुळे होत असलेले नुकसान यामुळे विजेच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा भुर्दंड ग्राहकांना बसतो आहे. वीज दर कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रियेचे नियोजन करण्यासाठी येत्या २१ ते २३ जानेवारीदरम्यान ऊर्जा खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
यात राज्यातील उपलब्ध विजेचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर ३० जानेवारीपूर्वी वीज नियामक आयोगाकडे वीज दर कमी करण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
बावनकुळे म्हणाले, वीज दर कमी करण्यासाठी कोळशावर होणारा वाहतूक खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर वीज वितरण प्रक्रियेत होणारी वीज गळती कशी कमी करता येईल, याकडे विशेषत्वाने लक्ष देण्यात येत आहे. वेकोलिकडून पुरविल्या जाणाऱ्या कोळशाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच वीज खरेदीसाठी व कोळशाच्या पुरवठ्यासाठी ओपन एक्सेस पॉलिसीच्या माध्यमातून खर्च कमी करण्याचा प्रयत्न आहे.

Web Title: Energy indicator of power tariff cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.