शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

नालासोपाऱ्यात राम मंदिर संकल्प यात्रा उत्साहात संपन्न

By admin | Updated: April 7, 2017 03:05 IST

अयोध्येत राम मंदिर बांधले जावे, हा हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न बनला आहे.

वसई : अयोध्येत राम मंदिर बांधले जावे, हा हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे आता कोणावरही विसंबून न राहता हिंदूंनी संघटीत होऊन राम मंदिर बांधण्यासाठी आणि भारत भूमीत हिंदु राष्ट्र आणण्यासाठी संकल्प करावा, असे आवाहन नालासोपारा येथे श्रीराम मंदिर संकल्प यात्रेच्या निमित्ताने करण्यात आले. हिंदू गोवंश रक्षा समिती, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग सेवा दल, योग वेदांत समिती, हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था यांनी काढलेल्या श्रीराम मंदिर संकल्प यात्रेत भाजपा, शिवसेना आणि मनसेचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. जैन साधू सिद्धार्थ मुनी, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजन नाईक, मनोज बारोट, परेश भावशी, सुरेंद्र मिश्रा, नेहा दुबे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. सोपारा गावातील श्री चक्रेश्वर महादेव मंदिराजवळ प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेची आणि धर्मध्वजाची विधीवत पूजा करून संकल्प यात्रा सुरु करण्यात आली. फुलांनी सजवलेल्या रथामध्ये प्रभू रामचंद्रांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. यात्रा मार्गातील पाच किलोमीटरचा परिसर भगवे ध्वज लावून भगवामय करण्यात आला होता. मंदिर तो बनाएंगे, रामराज्य भी लायेंगे, जय श्रीराम अशा घोषणा दिल्या गेल्या. यात्रा मार्गात अनेक ठिकाणी रामचंद्रांच्या प्रतिमेचे आणि धर्मध्वजाचे औक्षण करण्यात आले. हिंदुओंका एक ही नारा, अयोध्यामें ह राम मंदिर हमारा, शपथ रामकी खाते है मंदिर वही बनाएंगे या आशयाचे फलक यात्रेत लावण्यात आले होते. सेंट्रला पार्क मैदानात यात्रेचा समारोप करण्यात आला. ज्या पवित्र स्थळावर प्रभू रामचंद्रांनी जन्म घेतला, दुर्दैवाने त्यांना दहा बाय दहाच्या तंबूत पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात दिवस कंठावे लागत आहेत. राम मंदिर बांधण्यासाठी पुरावे द्यावे लागत आहेत. राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे आणि हिंदूंच्या अतिसहिष्णूतेमुळे हिंदूंनाच मंदिर बांधण्यासाठी आंदोलने करावी लागत आहेत, असा आरोप आयोजक वैभव राऊत यांनी यावेळी केला. यावेळी यात्रेत सहभागी झालेल्यांनी अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यासाठी आणि भारतभूमीत हिंदू राष्ट्र स्थापन करण्यासाठी कटीबद्ध राहण्याची शपथ घेतली. (वार्ताहर)