वर्षपूर्तीलाच बीआरटी अंधारात
By Admin | Updated: August 26, 2016 00:54 IST2016-08-26T00:54:40+5:302016-08-26T00:54:40+5:30
प्रवाशांना सवलतीच्या दरात पास देऊन प्रवासी वाढीसाठीचा आनंदोत्सव साजरा करण्याची तयारी पीएमपी प्रशासन आणि महापालिकेने सुरू केली
_ns.jpg)
वर्षपूर्तीलाच बीआरटी अंधारात
पुणे : संगमवाडी बीआरटी मार्गाच्या वर्षपूर्तीनिमित्त प्रवाशांना सवलतीच्या दरात पास देऊन प्रवासी वाढीसाठीचा आनंदोत्सव साजरा करण्याची तयारी पीएमपी प्रशासन आणि महापालिकेने सुरू केली आहे. मात्र, ज्या मार्गाची वर्षपूर्ती होणार आहे, त्या मार्गावरील संगमवाडी येथील दोन बसथांब्याची बत्ती महावितरणने गुल केली आहे. या थांब्यासाठीचे वीजबिल न भरल्याने या ठिकाणचे वीजमीटर महावितरणने जप्त केले आहेत. त्यामुळे या मार्गाची प्रथम वर्षपूर्ती अंधारातच होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महापालिका आणि पीएमपी प्रशासनाकडून मागील वर्षी १ सप्टेंबर रोजी विश्रांतवाडी ते संगमवाडी या मार्गावर बीआरटी सेवा सुरू करण्यात आली होती. त्याला पुढील आठवड्यात एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, एका वर्षातच या मार्गाची प्रचंड दुरवस्था झालेली असून, अनेक स्थानकांवरील वीजपुरवठाही खंडित असल्याचे समोर आले आहे. पीएमपी प्रवासी मंचाचे कार्यकर्ते प्रतीक धात्रक यांनी प्रत्यक्ष संगमवाडी-विश्रांतवाडी या मार्गाची बीआरटी २० आॅगस्ट व २५आॅगस्ट २०१६ रोजी केलेल्या पाहणीत या मार्गावर असलेल्या अनेक गंभीर बाबी निदशर्नास आल्या आहेत. त्यात या दोन थांब्यांवरील मीटर जप्त केल्याचेही समोर आले आहे.
(प्रतिनिधी)
>स्थानकाचे दरवाजे २४ तास धोकादायकरीत्या सताड उघडे असणे, आयटीएमएस, प्रवासी माहिती यंत्रणा बंद असल्याने प्रवाशांना येणारी बस पाहण्यासाठी धोकादायकरीत्या डोकवावे लागणे, बीआरटी स्थानकात व मार्गावर रात्री पूर्ण अंधार असणे, हायटेन्शन वायर स्थानकात धोकादायक स्वरूपात लटकणे, संगमवाडी ट्रान्स्फर स्थानक, आयटीएमएस, अद्ययावत प्रवासी उपयुक्त माहिती, आसनव्यवस्था, तिकीट व पास केंद्र ई सह अद्यापही कार्यरत नाही.
अखंडित वीजपुरवठ्यासाठी सर्व थांब्यांवर व स्थानकात इन्व्हर्टर व्यवस्था अत्यावश्यक आहे. सध्या वीजपुरवठा नसल्यास सर्व बीआरटी थांब्यांचे दरवाजे धोकादायकरीत्या खुले ठेवण्यात आले आहेत.