शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
6
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
7
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
8
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
9
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
10
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
11
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
12
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
13
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
14
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
15
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
16
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
17
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
18
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
19
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
20
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...

हिंदुस्थानी रोहिंग्यांची ब्याद आताच संपवा! नगरमधील मुस्लिमांनी निषेध करावा हे भयंकरच - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 10:41 AM

म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्नावर नगरमध्ये एका मुस्लिम गटाने आंदोलन केले. त्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून अत्यंत कडवट भाषेत टीका केली आहे.

ठळक मुद्देरोहिंग्यांसाठी नगरमधील मुसलमानांच्या एका गटाने निषेध करावा हे भयंकरच आहे. ज्यांना जगाच्या नकाशावर म्यानमार कुठे आहे ते माहीत नाही असे लोक रोहिंग्यांसाठी छाती पिटतात.

मुंबई, दि. 11 - म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्नावर नगरमध्ये एका मुस्लिम गटाने आंदोलन केले. त्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून अत्यंत कडवट भाषेत टीका केली आहे. रोहिंग्यांसाठी नगरमधील मुसलमानांच्या एका गटाने निषेध करावा हे भयंकरच आहे. ज्यांना जगाच्या नकाशावर म्यानमार कुठे आहे ते माहीत नाही असे लोक रोहिंग्यांसाठी छाती पिटतात. महाराष्ट्रात ही कीड वळवळू लागली असेल तर या हिंदुस्थानी रोहिंग्यांची ब्याद आताच संपवायला हवी असे अग्रलेखात म्हटले आहे. 

जगभरात मुसलमानांवर कुठेही अन्याय वगैरे झाला की हिंदुस्थानातील मुसलमानांच्या अंगास खाज सुटते व ते ‘इस्लाम खतरे में’च्या नावाने उगाच खाजवू लागतात. म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांवर अन्याय-अत्याचार होत असल्याचे सांगत नगरमधील मुसलमानांनी रस्त्यावर येऊन शुक्रवारी आंदोलन केले व म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षांचा पुतळा जाळून निषेध केला. नगरमधील ज्या मुसलमानांनी हे उद्योग केले त्यांना म्यानमार म्हणजे मालेगाव किंवा मुंबईतील मालवणी वाटले काय?  असा सवाल अग्रलेखात विचारला आहे. 

एरवी सामनाच्या अग्रलेखातून सातत्याने मोदींवर टीका सुरु असते. पण रोहिंग्या मुस्लिमांना आश्रय न देण्याच्या मोदींच्या भूमिकेबद्दल त्यांचे कैतुक केले आहे. रोहिंग्या मुसलमानांना निर्वासित म्हणून हिंदुस्थानात आश्रय द्यावा अशा राजकीय खटपटी-लटपटी येथील काही बेगडी निधर्मीवाद्यांनी केल्या. ‘मानवता’ वगैरे शब्दांचे बुडबुडे त्यांनी फोडले तरी पंतप्रधान मोदी अजिबात बधले नाहीत. त्याबद्दल आम्ही त्यांचे खास अभिनंदन करीत आहोत. 

काय म्हटले आहे अग्रलेखात - रोहिंग्यांसाठी नगरमधील मुसलमानांच्या एका गटाने निषेध करावा हे भयंकरच आहे. ज्यांना जगाच्या नकाशावर म्यानमार कुठे आहे ते माहीत नाही असे लोक रोहिंग्यांसाठी छाती पिटतात. महाराष्ट्रात ही कीड वळवळू लागली असेल तर या हिंदुस्थानी रोहिंग्यांची ब्याद आताच संपवायला हवी. नगरच्या ‘रोहिंग्यां’ना राजकीय पाठबळ मिळू नये. कोणी देण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांच्या रोहिंग्याप्रेमाचाही बंदोबस्त करावाच लागेल!

- जगभरात मुसलमानांवर कुठेही अन्याय वगैरे झाला की हिंदुस्थानातील मुसलमानांच्या अंगास खाज सुटते व ते ‘इस्लाम खतरे में’च्या नावाने उगाच खाजवू लागतात. म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांवर अन्याय-अत्याचार होत असल्याचे सांगत नगरमधील मुसलमानांनी रस्त्यावर येऊन शुक्रवारी आंदोलन केले व म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षांचा पुतळा जाळून निषेध केला. नगरमधील ज्या मुसलमानांनी हे उद्योग केले त्यांना म्यानमार म्हणजे मालेगाव किंवा मुंबईतील मालवणी वाटले काय? ज्यांनी रस्त्यावर उतरून हा निषेध वगैरे केला त्यांना म्यानमार कुठे आहे व तिथे काय चालले आहे, मुळात रोहिंग्या मुसलमानांची समस्या आहे तरी काय याबाबत काही माहिती आहे काय? रोहिंग्या मुसलमानांचा प्रश्न हा म्यानमार देशाचा अंतर्गत प्रश्न असून रोहिंग्यांमुळे त्या देशाच्या अखंडतेस व सुरक्षेस धोका निर्माण झाल्याने त्यांच्यावर तिथे कठोर कारवाई सुरू आहे. रोहिंगे मुसलमान हे पाकिस्तानच्या अझहर मसूद वगैरे दहशतवादी मंडळींचे फतवे मानतात व धार्मिक तेढ निर्माण करून फुटीरतेची बीजे रोवतात. त्यांना म्यानमारचा तुकडा पाडायचा आहे. अशा फुटीरतावाद्यांना दयामाया दाखवणे कोणत्याही देशाला परवडणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचे बुलडोझर फिरताच पळापळ झाली व इतर देशांत त्यांची घुसखोरी झाली. या रोहिंग्यांच्या नावाने पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचे म्होरके गळा काढीत आहेत हे कसले लक्षण समजायचे व अशा रोहिंग्यांसाठी नगरमधील मुसलमानांच्या एका गटाने निषेध करावा हेसुद्धा भयंकरच आहे. 

- रोहिंग्या मुसलमानांना निर्वासित म्हणून हिंदुस्थानात आश्रय द्यावा अशा राजकीय खटपटी-लटपटी येथील काही बेगडी निधर्मीवाद्यांनी केल्या. ‘मानवता’ वगैरे शब्दांचे बुडबुडे त्यांनी फोडले तरी पंतप्रधान मोदी अजिबात बधले नाहीत. त्याबद्दल आम्ही त्यांचे खास अभिनंदन करीत आहोत. प. बंगाल व आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांनी आधीच हैदोस घातला आहे. त्यात आता या म्यानमारी रोहिंग्यांची भर नको. मागे एकदा म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांवरील कारवाईची छायाचित्रे ‘व्हायरल’ करून येथील मुसलमानांच्या खोपड्या भडकवून दंगा पेटविण्याचा प्रयत्न झाला होता. मुंबईच्या आझाद मैदानातदेखील काही वर्षांपूर्वी धर्मांध मुस्लिमांनी दुसऱ्या देशातील वादावरूनच धुडगूस घातला होता. तेथील शहीद जवानांच्या अमर जवान ज्योतीची तोडफोड करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. तेव्हा इतर देशांतील मुस्लिमांबाबतच्या वादग्रस्त घटनांवरून आमच्याकडे अशा ठिणग्या पडतच असताना सरकारने रोहिंग्यांच्या प्रश्नाबाबत अति सावधान राहणे गरजेचे आहे. ज्यांना जगाच्या नकाशावर म्यानमार कुठे आहे ते माहीत नाही असे लोक रोहिंग्यांसाठी छाती पिटतात. महाराष्ट्रात ही कीड वळवळू लागली असेल तर या हिंदुस्थानी रोहिंग्यांची ब्याद आताच संपवायला हवी. नगरच्या ‘रोहिंग्यां’ना राजकीय पाठबळ मिळू नये. कोणी देण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांच्या रोहिंग्याप्रेमाचाही बंदोबस्त करावाच लागेल!

टॅग्स :Shiv Senaशिवसेना