नागपूरमध्ये द्वेषातून ‘युग’चा अंत
By Admin | Updated: September 4, 2014 02:05 IST2014-09-04T02:05:34+5:302014-09-04T02:05:34+5:30
लकडगंज गुरुवंदना सोसायटीतील युग चांडक या आठ वर्षीय मुलाचे द्वेष भावनेतून अपहरण करून खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

नागपूरमध्ये द्वेषातून ‘युग’चा अंत
नागपूर : लकडगंज गुरुवंदना सोसायटीतील युग चांडक या आठ वर्षीय मुलाचे द्वेष भावनेतून अपहरण करून खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. युगच्या वडिलांच्या डेंटल क्लिनीकमधून नोकरीवरून काढलेल्या नराधम तरुणानेच ही हत्या केल्याचे स्पष्ट झाले.
हत्येप्रकरणी अटक केलेल्या दोघांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिका:यांसमोर हजर केल्यानंतर 15 सप्टेंबर्पयत त्यांना पोलीस कोठडी दिली. राजेश धनालाल दवारे (19) आणि अरविंद अभिलाष सिंग (23) अशी आरोपींची नावे आहेत. राजेश दवारे येथील डॉ. मुकेश चांडक यांच्या ‘डेंटल क्लिनिक’मध्ये अटेन्डन्स कम क्लर्क म्हणून अर्धवेळ काम करीत होता. दुसरीत शिकणारा युग राजेशच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवायचा आणि वडिलांना सांगायचा. राजेश, रुग्णांकडून आगाऊ फी घ्यायचा. फीबाबतच्या संगणकातील अनेक नोंदी त्याने डिलीट केल्या होत्या. युग संगणकावर खेळत असताना त्याला ही बाब समजली आणि त्याने वडिलांना त्याबाबत सांगितले. तेव्हापासूनच राजेश युगचा द्वेष करीत होता. त्याने दोन-तीन वेळा युगला मारलेही होते. त्यावरून डॉ. चांडक यांनी राजेशला फटकारले होते.
मात्र त्याच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने डॉ. चांडक यांनी त्याला 8 ऑगस्टला कामावरून काढले होते. युगमुळेच नोकरी गमावल्याची सल मनात ठेवून एक आठवडापूर्वीच त्याने आपला मित्र अरविंद सिंग यांच्या मदतीने सूड घेण्याची योजना आखली होती. (प्रतिनिधी)
‘पप्पा जल्दी बुला रहे हैं’
मंगळवारी सायंकाळी युग स्कूल बसमधून घराजवळ उतरताच राजेशने त्याला ‘पप्पाने जल्दी क्लिनिक में बुलाया हैं’, असे सांगितले. युगने चौकीदाराला दफ्तर देऊन तो राजेशच्या स्कूटीवर बसला होता. रस्त्यात अरविंदने स्कूटीचा ताबा घेतला. पळण्याचा प्रयत्न करणा:या युगच्या नाकावर क्लोरोफॉर्मचा रुमाल लावला.