विद्यार्थ्यांनी काढली कॉपीची अंत्ययात्रा

By Admin | Updated: February 12, 2015 00:05 IST2015-02-12T00:05:41+5:302015-02-12T00:05:41+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी कॉपीच्या तिरडीला खांदा देवून केले दहन.

The end of copy of students concluded | विद्यार्थ्यांनी काढली कॉपीची अंत्ययात्रा

विद्यार्थ्यांनी काढली कॉपीची अंत्ययात्रा

पंजाबराव देशमुख / पिंपळगाव राजा (जि. बुलडाणा) : परीक्षेत कॉपी करणार नाही अशी शपथ घेत, जिल्हा परिषद हायस्कूल पिंपळगाव राजा येथील विद्यार्थ्यांनी कॉपीची अंत्ययात्रा काढली. अंत्ययात्रेनंतर कॉपीचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. हे अभिनव कॉपीमुक्त अभियाने बुलडाणा जिल्ह्य़ातील पिंपळगाव राजा येथे मंगळवारी राबविण्यात आले. महाराष्ट्र राज्य शासनाने ह्यगैर मार्गाशी लढाह्ण या घोषवाक्याद्वारे कॉपी मुक्त अभियानास प्रारंभ केला आहे. राज्यातील विविध शाळांमध्ये कॉपीमुक्ततेची शपथ घेत, विविध उपक्रम राबविल्या जातात. मात्र, पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी यापलिकडे जात, मंगळवार दि. १0 फेब्रुवारी रोजी कॉपीची अंत्ययात्रा काढून कॉपी मुक्ततेची शपथ घेतली. शेखर खोमने यांच्या संकल्पनेनुसार प्राचार्य बी. जे. मोरे यांच्या मार्गदर्शनात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी हे अभिनव कॉपीमुक्त अभियान राबविले.

*विद्यार्थ्यांनी दिला खांदा अन् धरले टिटवे

 कॉपीच्या तिरडीला सागर ओस्तवाल, आकाश इंगळे, अमन खुर्दरा, पवन क्षीरसागर या विद्यार्थ्यांनी खांदा दिला. कृष्णा दांडगे याने तिरडी धरली. या अंत्ययात्रेत पर्यवेक्षक अरविंद सातव, डी.पी. मोरे, एम.जे. लोखंडे, पी.आर.देशमुख, कांचन थोरात, दिपाली धार्मिक, भागवतकर, वैभव वानखडे आदी दहावी-बारावीचे विद्याथ्र्यी सहभागी झाले होते.

Web Title: The end of copy of students concluded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.