विश्वकोश परिपूर्तीकडे

By Admin | Updated: November 25, 2014 23:26 IST2014-11-25T23:26:49+5:302014-11-25T23:26:49+5:30

परिप्रेक्षाच्या चौकटीतून विश्वकोशाची संकल्पना ख:या अर्थाने सुस्पष्ट होते. संदर्भ आणि नोंदी बिनचूक तपासण्यासाठी विश्वकोशाचे परिमाण हे अंतिम मानले जाते.

Encyclopedia | विश्वकोश परिपूर्तीकडे

विश्वकोश परिपूर्तीकडे

नम्रता फडणीस  - पुणो
‘‘जे जे विश्वी कोंदले,
ते ते ग्रंथी गोंदिले’’
या परिप्रेक्षाच्या चौकटीतून  विश्वकोशाची  संकल्पना  ख:या अर्थाने सुस्पष्ट होते. संदर्भ आणि नोंदी बिनचूक तपासण्यासाठी विश्वकोशाचे परिमाण हे अंतिम मानले जाते. यावरून ग्रंथसंपदेच्या क्षेत्रतील विश्वकोशाचे अनन्यसाधारण महत्व विशद होते. 
अनेक वर्षापूर्वी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी  विश्वकोशाचे जे काम सुरू केले होते, त्या विश्वकोशाच्या विसाव्या खंडाच्या उत्तरार्धाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. अखेरच्या नोंदीनंतर विश्वकोश प्रकल्पाचे एक आवर्तन पूर्ण होणार आहे. विश्वकोशाच्या परिपूर्तीचे हे पहिले पाऊल असेल.
 
4आज मराठीच्या कक्षा, कार्यसीमा उंचावल्या आहेत. ज्ञानक्षेत्रची व्याप्ती विस्तारत आहे, अशा युगामध्ये इंसायक्लोपिडिया ब्रिटानिका आणि  इंसायक्लोपिडिया अमेरिकासारखा अद्यावत अशा सर्वसमावेशक संग्राहकासारखा एकही संदर्भग्रंथ मराठीमध्ये नाही, हीच गरज ओळखून विश्वकोश निर्मितीचे कार्य हाती घेतले.
4शास्त्रीबुवांच्या अध्यक्षतेखाली सुरूवातीला ग्रंथाचे 17 खंड प्रकाशित करण्याचे निश्चित करण्यात आले; मात्र नोंदीची संख्या वाढल्यामुळे त्याचे 2क् खंड निर्मित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती  विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 
 
4विश्वकोशाचा विसावा खंड हा ‘संहिता’ (शरीर खंड) ग्रंथ म्हणून प्रकाशित केला जाणार आहे. या खंडात 135क् नोंदी असल्याने मंडळातर्फे  त्याचे दोन भाग करण्यात आले आहेत. ‘सेई शोनागुन ते हर्षचरित’ हा ग्रंथांचा पूर्वार्ध तयार झाला आहे. या पहिल्या भागाच्या सर्व नोंदी ें1ं3ँ्र5्र2ँ5ं‘2ँ.्रल्ल  या संकेतस्थळावर उपलब्ध  करून देण्यात  आल्या आहेत. 
 
खंडाच्या उत्तरार्धाचे काम अंतिम टप्यात पोहोचले असून ‘™ोयवाद’ ही त्यातील अखेरची नोंद विश्वकोश प्रकल्पाचे एक आवर्तन पूर्ण करणार आहे. हे पहिले आवर्तन ग्रंथ स्वरूपात आणि इंटरनेट आवृत्तीच्या माध्यमातून येत्या सहा महिन्यात जगभरातील भाषाप्रेमी आणि तज्ज्ञांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.
 - डॉ. विजया वाड, अध्यक्ष विश्वकोश निर्मिती मंडळ 
 
4खंडाचा पूर्वार्ध हा 688 नोंदी, 42 चित्रपत्रे यांनी सजला आहे. हत्ती, हिमालय, अहिल्याबाई होळकर, हर्षचरित, सौंदर्यशास्त्र, स्त्रीशिक्षण अशा सुरेख नोंदींनी हा ग्रंथ परिपूर्ण झाला आहे. 
4आज गुजराथी, हिंदी आदी अनेक भाषांमधील विश्वकोश निर्मित झाले आहेत. मात्र इंटरनेटवर या  विश्वकोशांच्या संदर्भ सूचीच केवळ  आपल्याला पहायला मिळतात. सीडॅकच्या सहाय्याने मराठीतील 25 हजार पानांचा विश्वकोश पहिल्यांदाच इंटरनेटवर उपलब्ध होणार. 
4कुमार विश्वकोश : जीवसृष्टी आणि पर्यावरण भाग 2 (घटसर्प ते पॅरामिशियम)ची ब्रेल आवृत्ती नॅबच्या सहाय्याने तयार. पहिल्या भागाप्रमाणो हा भागही दोन महिन्यात बोलक्या स्वरूपात प्रकाशित होणार. 
4विश्वकोश निर्मिती मंडळाच्या 1 डिसेंबर रोजी साजरा होणा:या वर्धापनदिनानिमित्त  ‘माझी मराठी मराठी तिचे कौतुक कौतुक’ आणि ‘उतरली नभातून माळ, ही माळ नक्षत्रंची’ ही विश्वकोश आणि कन्याकोशाची गीते व्हिज्युअल स्वरूपात प्रकाशित होणार आहेत. डॉ. अविनाश तुपे आणि गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या हस्ते अर्पण. 

 

Web Title: Encyclopedia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.