ढोल-ताशा संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे
By Admin | Updated: August 2, 2016 01:09 IST2016-08-02T01:09:56+5:302016-08-02T01:09:56+5:30
पुण्यातून उदयाला आलेली ढोल-ताशा संस्कृती राज्यात रुजली आहे.

ढोल-ताशा संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे
पुणे : पुण्यातून उदयाला आलेली ढोल-ताशा संस्कृती राज्यात रुजली आहे. यातून युवा शक्ती एकित्रत येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा ढोल-ताशाचा खेळ जतन करून त्याला केंद्र आणि राज्य सरकारने सुरक्षा, प्रोत्साहन द्यायला हवे, अशी अपेक्षा राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या म्हसोबा उत्सवांतर्गत बुरूडआळी, मंडई येथे आयोजित स्व. उत्तमराव भिंताडे स्मरणार्थ ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेचे उद््घाटन पाटील यांच्या हस्ते सोमवारी झाले, त्या वेळी ते बोलत होते.
पुणे एटीएसचे प्रमुख भानुप्रताप बर्गे, डॉ. सतीश देसाई, उद्योजक गणेश भिंताडे, नगरसेविका रूपाली पाटील ठोंबरे, अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके, विनोद खेडेकर, कसबा संस्कार केंद्राचे अनिल दिवाणजी, स्पर्धेचे परीक्षक व ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर आदी उपस्थित होते. पाटील आणि बर्गे यांनी ढोल-ताशावादन करून स्पर्धेचे उद््घाटन केले. निवृत्ती जाधव यांनी प्रास्ताविक केले. अभिनेत्री अश्विनी जोग यांनी सूत्रसंचालन केले.
>राज्याची वेगळी ओळख
पराग ठाकूर म्हणाले, ‘‘ढोल-ताशावादनामुळे राज्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. तरुणांप्रमाणेच तरु णीदेखील याचे उस्फूर्तपणे वादन करतात. केवळ वादनापुरतीच ही पथके संस्कृती मर्यादित नाही.’’