..अन् उलगडला पुनर्जन्माचा प्रवास
By Admin | Updated: August 16, 2014 23:39 IST2014-08-16T23:39:36+5:302014-08-16T23:39:36+5:30
मुंबईहून पुण्याला येत असताना रात्रीच्या वेळी अचानक झालेला मोठा अपघात..

..अन् उलगडला पुनर्जन्माचा प्रवास
>पुणो : मुंबईहून पुण्याला येत असताना रात्रीच्या वेळी अचानक झालेला मोठा अपघात.. गंभीर जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल झाल्यानंतर केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मृत्यूला परत पाठवून मिळवलेला पुर्नजन्म.. मदतीला धावून आलेले असंख्य हात.. रुग्णालयामधून घरी परतल्यानंतर त्यातून खंबीरपणो उभे राहण्याचा प्रवास उलगडला. निमित्त होते व्यावसायिक अशोक नवाल यांच्या मुलाखतीचे. त्यांची मुलाखत सुधीर गाडगीळ यांनी घेतली. या मुलाखतीमध्ये नवाल यांचा रोमांचकारी प्रवास उलगडला. ते ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले.
आनंदयात्री प्रकाशनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये अशोक नवाल यांनी लिहलेल्या ‘रिबॉन अॅट 54’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार विद्याधर पानट यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सह्याद्री रुग्णालयाचे संचालक डॉ. चारू आपटे, सुधीर गाडगीळ, अशोक नवाल, चित्र नवाल, सुशील नवाल उपस्थित होते.
डॉ. चारू आपटे म्हणाले, ‘‘नवाल हे 52 दिवस रुग्णालयामध्ये होते. या कालावधीमध्ये त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस करणारे किमान चार फोन तरी यायचे. आमची टीम तर प्रयत्न करीत होतीच; त्याचबरोबर नवाल याच्या परिवाराची खंबीर साथ व त्यांची इच्छाशक्ती याचा मोठा हातभार लागला.’’
सुशील नवाल यांनी प्रास्ताविक केले. बिझसोल ग्रुपचे व्यंकटाचलम् यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
अपघातानंतरचा प्रवास
4मुंबईतील काम आटोपून 17 जून 2क्क्9 रोजी रात्री अशोक नवाल पुण्याला परतत होते. पुण्यापासून 2क्-25 किलोमीटर अंतरावर असताना एका टेम्पोचालकाच्या चुकीमुळे नवाल यांच्या मोटारीला मोठा अपघात झाला. मोटारीमध्ये पाठीमागच्या सीटवर झोपलेले नवाल अपघानंतर आतमध्ये चेंबले जाऊन गंभीर जखमी झाले. मोटारीमध्ये अडकलेल्या स्थितीमध्ये वाहनचालकाने नवाल यांच्या पत्नीला व मित्रंना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतरचा नवाल यांचा प्रवास या पुस्तकात आला आहे.
‘भीषण अपघातातून पुनर्जन्म झाला, तो फक्त माणसातल्या माणुसकीमुळेच. या स्वार्थी जगामध्येही चांगली माणसे आहेत म्हणून हे जग खूप चांगलं आहे. सहानुभूतीपेक्षा कर्तव्यबुद्धीने मदत करणारी माणसे भेटली. त्यांचे अनुभव पुस्तकरूपाने जगासमोर आणून त्यातून इतरांना प्रेरणा मिळावी, हाच या लेखनामागचा हेतू होता.
- अशोक नवाल,
लेखक, ‘रिबॉन अॅट 54’
आपल्यावर कितीही संकटे आली, तरी इच्छाशक्तीच्या जोरावर आपण त्यातून बाहेर पडू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे अपघानंतरचा अशोक नवाल यांचा प्रवास होय.
- विद्याधर पानट,
ज्येष्ठ पत्रकार