रिकामी खुर्ची... विखुरलेली पुस्तकं
By Admin | Updated: February 22, 2015 02:19 IST2015-02-22T02:19:41+5:302015-02-22T02:19:41+5:30
आयडियल सोसायटीतील बंगल्याच्या प्रवेशद्वारातच ‘गोविंद पंढरीनाथ पानसरे’ हे शब्द लिहिलेले अण्णांचे सागरमाळ परिसरातील घर आता पोरके झाले.

रिकामी खुर्ची... विखुरलेली पुस्तकं
कोल्हापूर : आयडियल सोसायटीतील बंगल्याच्या प्रवेशद्वारातच ‘गोविंद पंढरीनाथ पानसरे’ हे शब्द लिहिलेले अण्णांचे सागरमाळ परिसरातील घर आता पोरके झाले. घरात डोकावून पाहिल्यानंतर अण्णा काम करायचे त्या टेबलावर इतस्तत: विखुरलेली पुस्तकं आणि कामाची कागदपत्रेही सुन्नपणे जणू आपल्या वडिलांच्या रिकाम्या खुर्चीकडे टक लावून बघताहेत असं वाटतं
अण्णांच्या घरासमोरील रस्त्यावर अण्णा व त्यांच्या पत्नी उमा पानसरेंवर गोळ्या झाडण्यात आल्या. हा रस्ता आज निर्मनुष्य होता... त्या दिवसासारखाच. गेले पाच दिवस अण्णा आता ठीक आहेत, त्यांची तब्येत सुधारतेय, या बातम्या येत असल्याने अण्णा हा आघातही परतवून लावतील आणि पुन्हा घराचा आधारवड उभा राहील अशी आशा होती.
अण्णांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या दारात नागरिकांची गर्दी झाली.