पत्नीच्या छळप्रकरणी सक्तमजुरीची शिक्षा

By Admin | Updated: June 30, 2016 01:50 IST2016-06-30T01:50:21+5:302016-06-30T01:50:21+5:30

शिरूर न्यायालयाने आरोपी यमाजी भागूजी जगताप यास कलम ४९८ (अ) नुसार एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

Empowerment of women in the persecution of wife | पत्नीच्या छळप्रकरणी सक्तमजुरीची शिक्षा

पत्नीच्या छळप्रकरणी सक्तमजुरीची शिक्षा


शिरूर : दुसऱ्या पत्नीस शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करणे तसेच उपाशी ठेवून मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या प्रकरणात शिरूर न्यायालयाने आरोपी यमाजी भागूजी जगताप यास कलम ४९८ (अ) नुसार एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. आरोपीची आई, नणंद यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
यमाजी जगताप यांच्याबरोबर १९९२ रोजी विवाह झाला होता. पहिली पत्नी १० वर्षांपासून नांदत नसल्याने तिला घटस्फोट दिल्याची माहिती लक्ष्मीला देण्यात आली होती. लक्ष्मीशी विवाह केल्यानंतर आरोपीने तिला सहा महिने नांदविले. यानंतर त्याने पहिल्या पत्नीला (मीना) हिवरे-कुंभार येथे पुन्हा नांदवण्यास आणले. तेव्हा आरोपीचा पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला नसल्याचे समजले. यानंतर आरोपीने पहिल्या पत्नीसह सासू कमलाबाई, नणंद स्वाती व मीना यांनी लक्ष्मीचा छळ सुरू केला. लग्नानंतर दीड वर्षाने लक्ष्मीला मुलगा झाला. या मुलाचाही आरोपी राग करू लागला. या छळामुळे लक्ष्मी पतीपासून मुलासह वेगळी राहू लागली.
लक्ष्मी नांदत असताना आरोपीने घरातील कामे येत नाही, माहेर दरिद्री आहे, लग्नात हुंडा दिला नाही, तुझा व आमचा संबंध नाही, तू इथे राहायचे नाही, असे सुनावत लक्ष्मीला शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. उपाशी ठेवून छळ केला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याप्रकरणी निकाल देताना शिरूर न्यायालयाच्या न्यायाधीश एम. ए. आदुके यांनी आरोपी यमाजी भागूजी जगताप यास १ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. त्यास एक हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद देण्यात येते. अ‍ॅड. नीलेश लडकत यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.

Web Title: Empowerment of women in the persecution of wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.