शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 07:10 IST

महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र धोरण मंजूर, नवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रांतील अग्रस्थान टिकविण्यास साहाय्य

मुंबई : शहरी आणि ग्रामीण भागां सर्वसमावेशक विकास करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि प्रशासकीय गतिमानतेवर भर देणारे 'महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र धोरण २०२५' मंगळवारी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले. या धोरणामुळे राज्यात ५० हजार ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक व त्यातून सुमारे चार लाख रोजगार निर्मिती होईल, असे अपेक्षित आहे. या धोरणाचा कालावधी २०२५ ते २०३० असा राहणार आहे.

या धोरणामुळे अवकाश आणि संरक्षण, कृषी आणि अन्न प्रक्रिया, रत्ने व दागिने, लॉजिस्टिक्स, धातू खाणकाम, औषध निर्माण व रसायने, अक्षय आणि हरित ऊर्जा, वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोटिव्ह अशा प्राधान्य क्षेत्रांना गती मिळणार आहे.

'महाजिओटेक' महामंडळराज्याच्या विकासाला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड जेऊन एकात्मिक आणि नियोजनबद्ध गती देण्यासाठी महाजिओटेक महामंडळ स्थापन करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी १०६ पदांच्या निर्मितीसही मान्यता देण्यात आली.

राज्यात ४०० केंद्रेसन २०२१ मध्ये देशातील जागतिक क्षमता केंद्रांची संख्या सुमारे १२०० होती. आता ती १९०० पेक्षा जास्त झाली आहे. या केंद्रातून सुमारे १९ लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. राज्यात सध्या ४०० जागतिक क्षमता केंद्रे असून, त्यांमधून सुमारे चार लाख लोकांना रोजगार मिळालेला आहे. या धोरण कालावधीत आणखी ४०० नवीन जागतिक क्षमता केंद्रे स्थापन करणे, ४ लाख रोजगार निर्मिती, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विस्तार केला जाईल.

कर्करोग उपचारासाठी महाकेअर फाउंडेशनची स्थापना करण्याचा निर्णय१. राज्यातील कर्करोगग्रस्त रुग्णांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा धोरण निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर-रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन अर्थात 'महाकेअर फाउंडेशन कंपनी' स्थापन करण्याचा निर्णयदेखील बैठकीत घेण्यात आला आहे.

२. या कंपनीच्या माध्यमातून राज्यभरातील १८ रुग्णालयांतून कर्करोगाशी निगडित विशेषोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे राज्यात कर्करोगाशी संबंधित डे-केअर केंद्रांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे.

३. या केंद्राच्या माध्यमातून रेडिओथेरपी, केमोथेरपी तसेच पदव्युत्तर आणि अतिविशेषोपचार शिक्षण, सर्व प्रकारच्या कर्करोगांचे निदान, शस्त्रक्रिया, भौतिकोपचार, मानसिक आधार आणि उपचार, संशोधन यांसह पॅलेटिव्ह उपचार, औषध सुविधा यांची उपलब्धता तसेच जनजागृतीचे उपक्रमदेखील राबविले जाणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Approves Policy: 4 Lakh Jobs, ₹50,000 Crore Investment

Web Summary : Maharashtra's cabinet approved 'Maharashtra Global Capacity Centre Policy 2025', attracting ₹50,600 crore investment and creating 4 lakh jobs. The policy focuses on infrastructure, administration, and key sectors like aerospace, agriculture, and IT. 'Maha জিওটেক' Corporation will be established. A cancer care foundation will also be set up to improve treatment across 18 hospitals.
टॅग्स :GovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र