शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

त्या कर्मचाऱ्यांची इतर विभागात उचलबांगडी

By admin | Published: January 30, 2017 6:55 PM

वेण्णा लेक येथील बोट क्लबमधील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बोट क्लब अधीक्षकासह सहा जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली

आॅनलाइन लोकमतसातारा, दि. 30 -  महाबळेश्वरमधील वेण्णा लेक येथील बोट क्लबमधील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बोट क्लब अधीक्षकासह सहा जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, या गैरव्यवहाराची पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेऊन संबंधित पाच कर्मचाऱ्यांची तत्काळ बोट क्लब विभागातून उचलबांगडी करून त्यांना इतर विभागात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणाची खातेअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी आशा राऊत यांनी दिली.वेण्णा लेक येथे पालिकेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या बोट क्लबमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार चालतात, अशा तक्रारींमध्ये वाढ झाली होती. या तक्रारींची दखल घेऊन शनिवारी रात्री नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, मुख्याधिकारी आशा राऊत व नगरसेवक कुमार शिंदे यांनी बोट क्लबला अचानक भेट दिली. या भेटीत त्यांना येथे आर्थिक गैरव्यवहार आढळून आला. कोठेही नोंद नसलेली ६,५७० रुपये एवढी रक्कम आढळून आली. तसेच बोटमन यांच्या हजेरी व कामाच्या नोंदीमध्येही मोठी तफावत आढळून आली. अनेक बोटमन केवळ हजेरी लावतात व काम न करताच पगार घेतात, तर काही बोटमन गैरहजर दाखवून त्यांच्या नावावर काम करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.शनिवारी गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतरही रविवारी त्याच कर्मचाऱ्यांनी आपला पदभार सांभाळून कामकाज पाहिल्याने प्रशासन या गैरव्यवहारप्रकरणी गंभीर आहे का ? असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु सोमवारी मुख्याधिकाऱ्यांनी बोट क्लब अधीक्षक वगळता पाच कर्मचाऱ्यांची या विभागातून तत्काळ दुसऱ्या विभागात बदली करण्यात आल्याने बोट क्लबवर शुकशुकाट पसरला होता. सोमवारी तीन तास बोट क्लब उशिरा सुरू करण्यात आला. त्यामुळे सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत पर्यटकांची गैरसोय झाली. अनेक पर्यटकांना नौकाविहाराचा आनंद लुटता आला नाही. कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा...दिवसभर पालिकेत इतर कर्मचाऱ्यांमध्ये या प्रकरणाची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. प्रशासन काय कारवाई करणार व याप्रकरणी लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार, याकडे महाबळेश्वरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.