पीएमपी सक्षम करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा
By Admin | Updated: May 17, 2016 01:26 IST2016-05-17T01:26:56+5:302016-05-17T01:26:56+5:30
पीएमपीच्या स्थापनेपासून आतापर्यंत वाय-फाय हा सर्वाधिक अत्याधुनिक बदल आहे.

पीएमपी सक्षम करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा
पुणे : पीएमपीच्या स्थापनेपासून आतापर्यंत वाय-फाय हा सर्वाधिक अत्याधुनिक बदल आहे. या सेवेचा जास्तीत जास्त वापर करून पीएमपीच्या विकासासाठी नवीन तंत्रज्ञान आणि कार्यप्रणाली कर्मचाऱ्यांनी अमलात आणावी, असे आवाहन पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी कर्मचाऱ्यांना केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठान आणि जॉयस्टर इन्फो मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पीएमपीच्या सर्व डेपोंमध्ये आणि बसथांब्यावरील प्रवाशांसाठी पुरविण्यात येणाऱ्या वाय-फाय सुविधेचे उद्घाटन कृष्णा यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
बीआरटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मयूरा शिंदेकर, व्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे, मुख्य अभियंता आनंद वाघमारे, बोस प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप मोहिते, उपाध्यक्ष हाजी इलियास खान, उपाध्यक्ष सुधीर ढवळे, जायस्टरचे संचालक निकुंज कंपानी, पीएमटी कामगार संघाचे (इंटक) अध्यक्ष राजेंद्र खराडे, महासचिव नुरूद्दीन इनामदार या वेळी उपस्थित होते.
शंकरशेठ रोडवरील पीएमपीचे मुख्य कार्यालय, स्वारगेट बस डेपो व बीआरटी स्टॉप अशा तीन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. येत्या काळात १२१ प्रमुख स्थानकांवर २ एमबीपीएस स्पीडने मोफत वाय-फाय सुविधा पुरवली जाणार आहे. (प्रतिनिधी)