शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

नाशिकच्या महापालिका प्रसूतिगृहातील कर्मचारी आॅनड्युटी गायब अन् रिक्षामध्येच महिलेची प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 21:51 IST

पंचवटीतील पेठरोडवरील महापालिकेच्या मायको दवाखाना आणि प्रसूतिगृहातील कर्मचारी आॅनड्युटी असताना गायब झाल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची प्रसूती दवाखान्याच्या खालीच रिक्षात करावी लागली.

ठळक मुद्दे महिलेची प्रसूती दवाखान्याच्या खालीच रिक्षात महिला रिक्षाने प्रसूतिगृहापर्यंत आली प्रसुतिगृहातील एक महिला कर्मचारी धावत तेथे आली त्यानंतर त्या महिलेस प्रसूतिगृहात नेण्यात आले.

नाशिक : पंचवटीतील पेठरोडवरील महापालिकेच्या मायको दवाखाना आणि प्रसूतिगृहातील कर्मचारी आॅनड्युटी असताना गायब झाल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची प्रसूती दवाखान्याच्या खालीच रिक्षात करावी लागली. आजूबाजूच्या महिलांनी धाव घेऊन ही प्रसूती सुरक्षित केली असली तरी त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयातील अनागोंदी उघड झाली असून, परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दवाखान्यातील अधिकाºयांची झाडाझडती घेतल्यानंतर रजेवर असलेल्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.एखाद्या दुर्गम खेड्यापाड्यावर घडावी अशी घटना शहरात तेही पंचवटीसारख्या ठिंकाणी घडली असून, हा विषय गाजण्याची शक्यता आहे.पंचवटीत पेठरोड येथे झोपडपट्टी बहुल परिसर असून, तेथे महापालिकेचा दवाखाना व प्रसूतिगृह असून, तेथेही पुरेशा सुविधा नसल्याने ओरड होत आहे. या प्रसूतिगृहात सुविधा देऊ असे वारंवार आश्वासन महापालिका देत आहे. तथापि, प्रत्यक्षात मात्र कोणत्याही सुधारणा होत नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. याच परिसरात राहणार्‍या एका महिलेने रुग्णालयात प्रसूतीसाठी नोंदवले होते. त्यानुसार महिलेला प्रसूतिवेदना होताच येण्यास वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले होते. सोमवारी दुपारी सदरची महिला रिक्षाने प्रसूतिगृहापर्यंत आली. परंतु निरोप पाठवूनही कोणीही तिला घेण्यासाठी वा स्ट्रेचर घेऊन आले नाही. सुमारे अर्धातास प्रतीक्षा करूनही तेथे कोणी आले नाही. सर्व कर्मचारी बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. सुरक्षारक्षकही गायब होता.

याप्रकारानंतर त्या महिलेस प्रसूतिकळा येऊ लागताच याच परिसरातील अन्य महिला मदतीला धावल्या आणि रिक्षातच तिची प्रसूती करण्यात आली. तिला पुत्ररत्न झाल्याचे आणि माता आणि बालक दोघेही सुरक्षित असल्याचे कळाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यानंतर प्रसुतिगृहातील एक महिला कर्मचारी धावत तेथे आली त्यानंतर त्या महिलेस प्रसूतिगृहात नेण्यात आले. यावेळी परिसराचे नगरसेवक जगदीश पाटील, लोकनिर्णय संस्थेचे संतोष जाधव आणि अन्य नागरिकांनी संताप व्यक्त केला. प्रसुतिगृहातील सर्व कर्मचारी मस्टरवरील नोंदीनुसार हजर होते. मात्र प्रत्यक्षात कोणीच जागेवर नव्हते. एकमेव सुरक्षा कर्मचारी प्रसूतिगृहाच्या छतावर पंतग उडवत होता. नागरिकांचा गोंधळ आणि संताप बघून त्याने रुग्णालयाच्या कर्मचार्‍याना तातडीने मोबाइलवर संपर्क साधले. परंतु संतप्त युवकांनी त्याचा मोबाइल काढून घेतला. प्रसूतिगृहातील शुकशुकाट, मस्टरवरील हजेरीच्या नोंदी अशी सर्व बाबींचे कार्यकर्त्यांनी व्हिडीओ चित्रीकरण केले. यासंदर्भात नगरसेवक जगदीश पाटील यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. चिरमाडे धावपळ करीत आल्या. त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. डेकाटे यांनी सर्व प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले.

 

टॅग्स :Womenमहिलाpregnant womanगर्भवती महिला