सर्वेक्षणावर दिला जोर!

By Admin | Updated: February 27, 2015 02:28 IST2015-02-27T02:28:56+5:302015-02-27T02:28:56+5:30

मनमाड-धुळे-इंदोर नवीन मार्ग, चाळीसगाव-औरंगाबाद भुयारी मार्ग, नाशिक-पुणे मार्गाचे सर्वेक्षण लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने आता उत्तर महाराष्ट्रातील

The emphasis on the survey! | सर्वेक्षणावर दिला जोर!

सर्वेक्षणावर दिला जोर!

मिलिंद कुळकर्णी, जळगाव
मनमाड-धुळे-इंदोर नवीन मार्ग, चाळीसगाव-औरंगाबाद भुयारी मार्ग, नाशिक-पुणे मार्गाचे सर्वेक्षण लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने आता उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि जनतेला आवाज बुलंद करावा लागणार असल्याचे रेल्वे अर्थसंकल्पानंतर स्पष्ट झाले. त्यासोबतच नंदुरबार, जळगाव व अमळनेर या रेल्वे स्टेशनला आदर्श स्टेशनचा दर्जा घोषित झाला असला तरी पुरेशा सुविधा अद्याप नाहीत. आता पायाभूत सुविधांवर भर देणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केल्याने आशा पल्लवीत झाल्या आहेत.
प्रामुख्याने गोंदिया-पुणे महाराष्ट्र एक्स्प्रेस, शिर्डी-नगर-मुंबई यासह मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेच्या डब्यांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी आहे. जळगाव, अमळनेर, शिर्डी व नंदुरबार या रेल्वे स्थानकांना यापूर्वीच आदर्श स्थानकाचा दर्जा देण्यात आलेला आहे. पण आदर्श स्थानक म्हणून अपेक्षित सुविधा तेथे अद्यापही उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. मोठ्या स्थानकावर लिफ्ट व एस्कलेटरची सुविधा देण्यात येणार आहे. त्यात भुसावळ व मनमाड या जंक्शनचा समावेश होण्याची शक्यता आहे.
मनमाड-धुळे-इंदूर मार्गासाठी यापूर्वीच सर्वेक्षण झाले आहे. या मार्गासाठी ४ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.

Web Title: The emphasis on the survey!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.