इंदूरचा बडा व्यापारी डब्बा ट्रेडिंगचा बादशाह
By Admin | Updated: July 7, 2016 02:30 IST2016-07-07T02:30:00+5:302016-07-07T02:30:00+5:30
आकोट येथे सुरू असलेल्या डब्बा ट्रेडिंगवर पोलिसांनी छापेमारी करून कोट्यवधी रुपयांच्या या काळय़ा धंद्याचा पर्दाफाश केला आहे.

इंदूरचा बडा व्यापारी डब्बा ट्रेडिंगचा बादशाह
सचिन राऊत/ अकोला
स्टॉक एक्स्चेंजप्रमाणे चालविण्यात येत असलेल्या आणि शासनाचा कोट्यवधी रुपयांचा कर बुडवून सुरू करण्यात आलेल्या समांतर शेअर मार्केटच्या (डब्बा ट्रेडिंग) विदर्भातील अनधिकृत बाजाराचा सर्वेसर्वा मध्य प्रदेशातील एक बडा व्यापारी असून या बड्या व्यापार्यानेच विदर्भात डब्बा ट्रेडिंग चालविण्यासाठी ह्यसौदाह्ण साफ्टवेअर उपलब्ध केल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
राज्यात डब्बा ट्रेडिंगचा अवैध बाजार फोफावल्याचे पोलीस यंत्रणेच्या निदर्शनास आल्यानंतर मुंबई, नागपूर आणि त्यानंतर अकोला जिल्हय़ातील आकोट येथे सुरू असलेल्या डब्बा ट्रेडिंगवर पोलिसांनी छापेमारी करून कोट्यवधी रुपयांच्या या काळय़ा धंद्याचा पर्दाफाश केला आहे. आकोटातील नरेश भुतडा आणि त्याचा बंधू दिनेश भुतडा या दोघांनी कस्तुरी कमोडिटीजच्या माध्यमातून डब्बा ट्रेडिंगचा मोठा धंदा सुरू केल्याचे अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या विशेष पथकाने छापा घालून ७ जणांना अटक केली. या ठिकाणावरून ह्यसौदाह्ण नावाचे अनधिकृत सॉफ्टवेअर पोलिसांनी जप्त केल्यानंतर त्याची तपासणी केली. यामध्ये ह्यसौदाह्ण सॉफ्टवेअरचे इंदूर कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. विदर्भातील डब्बा ट्रेडिंग इंदूरमधून संचालित होत असल्याचीही माहिती उघड झाली आहे. इंदूरमधील हा बडा व्यापारीच वर्हाडातील डब्बा ट्रेडिंगचा बादशाह असल्याचा निष्कर्ष पोलीसांच्या तपास पथकाने काढला आहे.
अधिकृत असलेल्या स्टॉक एक्स्चेंजला छेद देणार्या या डब्बा ट्रेडिंगचा हा व्यवहार गुंतवणूकदाराच्या डी-मॅट खाते, पॅन क्रमांकाशिवाय चालत असल्याने डब्बा ट्रेडिंगमध्ये सर्वाधिक काळा पैसा गुंतविण्यात येत असल्याची माहिती आता समोर आली आहे. डब्बा ट्रेडिंगमधील गुंतवणूकदार शासनाचा हजारो कोटींचा कर चुकवून हा व्यवहार करीत असल्याचे आकोट आणि नागपूरमध्ये झालेल्या कारवाईनंतर स्पष्ट झाले आहे.
अकोला, अमरावती, नागपूरमधील व्यापारी
डब्बा ट्रेडिंग या अनधिकृत शेअर बाजारात अकोला, अमरावती व नागपूरमधील मोठय़ा व्यापार्यांनी पैसा गुंतविल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अकोला व अमरावती येथील व्यापार्यांची आता चौकशी करण्यात येणार आहे. या तीनही ठिकाणच्या मोठय़ा व्यापार्यांनी त्यांचा काळा पैसा डब्बा ट्रेडिंगच्या माध्यमातून गुंतविला आहे. या मोठय़ा व्यापार्यांची साखळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता असून, त्यानंतर पोलीस छापेमारी करण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. काळा पैसा गुंतविणारे हे व्यापारी लवकरच पोलिसांच्या रडारवर येणार आहेत.
ह्यसौदाह्ण इंदूरमधून संचालित
डब्बा ट्रेडिंगचा व्यवहार करण्यासाठी तयार करण्यात आलेले सौदा नावाचे सॉफ्टवेअरही अनधिकृत आहे. हे अनधिकृत सॉफ्टवेअर इंदूरमधून संचालित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काळा पैसा गुंतविण्यासाठी डब्बा ट्रेडिंग सर्वांंत सोईस्कर उपाय असून, यासाठी अनधिकृत असलेल्या ह्यसौदाह्ण नावाच्या सॉफ्टवेअरचा वापर जास्त प्रमाणात करण्यात येत आहे.