पाच दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप

By Admin | Updated: September 3, 2014 01:17 IST2014-09-03T01:17:24+5:302014-09-03T01:17:24+5:30

ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया. अशा जयघोषात पाच दिवसांच्या गणरायाला आज भावपूर्ण निरोप देण्यात आला.

The emotional message of 5 days Ganaraya | पाच दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप

पाच दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप

1 नवी मुंबई : ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया. अशा जयघोषात पाच दिवसांच्या गणरायाला आज भावपूर्ण निरोप देण्यात आला. रात्री उशिरार्पयत शहरातील विविध तलावांवर विसर्जन सुरू होते.
2महापालिका हद्दीत एकूण 23 विसर्जन तलाव आहेत.  वाशी, कोपरखैरणो, घणसोली, ऐरोली, नेरूळ तसेच बेलापूर  आणि पनवेल, उरण येथे पाच दिवसांच्या गणरायाचे मोठय़ा भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. त्यामुळे विसर्जन स्थळावर तसेच विसर्जनमार्गावर भाविकांची गर्दी दिसत होती. 
 
3 ढोलताशे, बॅन्जोच्या तालावर ठिकठिकाणी बाप्पांचा जयघोष करीत श्रींची मिरवणूक काढण्यात आली होती. प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना आखण्यात आल्या होत्या. प्रत्येक तलावावर स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले होते. पोलिसांच्या वतीने विसर्जन तलावावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला 
होता. रात्री उशिरार्पयत विसर्जन कार्य सुरू 
होते.

 

Web Title: The emotional message of 5 days Ganaraya