शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

कर्तबगार पोलिसांच्या सन्मानाला अखेर मुहूर्त! १६ जानेवारीला वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 05:12 IST

समाजात कायदा व सुव्यवस्थेसाठी कार्यरत असताना, बजावलेल्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण कार्याची दखल घेत, केंद्रीय गृहविभागाने त्यांना जवळपास ४ वर्षांपूर्वी पदकाची घोषणा केली होती.

- जमीर काझीमुंबई : समाजात कायदा व सुव्यवस्थेसाठी कार्यरत असताना, बजावलेल्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण कार्याची दखल घेत, केंद्रीय गृहविभागाने त्यांना जवळपास ४ वर्षांपूर्वी पदकाची घोषणा केली होती. प्रत्यक्षात सन्मानाच्या प्रतीक्षेत त्यातील काही जण सेवानिवृत्त झाले. नव्या वर्षात मात्र त्यांची ही प्रतीक्षा संपणार असून, १६ जानेवारीला पदक वितरणाचा सोहळा होणार आहे.२०१५ साली प्रजासत्ता व स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्टÑपती पोलीस पदक जाहीर झालेल्या शंभर पोलीस अधिकारी, अंमलदारांना राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते पदकाचे वितरण करण्यात येईल. राजभवन किंवा पोलीस मुख्यालयात होणारा हा सोहळा यंदा नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होईल. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.दरवर्षी प्रजासत्ताक व स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्टÑपती पदक व पोलीस पदक विजेत्यांची घोषणा होते. राज्य सरकारने पाठविलेल्या प्रस्तावानुसार, त्याबाबत निर्णय घेतला जातो. पुरस्काराची घोषणा झाल्यावर संबंधितांच्या नावाने बनविलेले पदक केंद्राकडून संबंधित राज्यांना पाठविले जाते. त्यासाठी ६ ते ८ महिन्यांचा अवधी अपेक्षित असतो. मात्र, २०१५ या वर्षात घोषित झालेले पुरस्कार पदकांचे काम अपूर्ण असल्याने अद्याप दिले नव्हते. आता त्याची तारीख निश्चित झाली असून, येत्या १६ जानेवारीला राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते ४ वाजता हा सोहळा होईल. त्यापूर्वी १४ जानेवारीला या कार्यक्रमाची रंगीत तालीम सोहळ्याच्या ठिकाणी होणार आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र