मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

By Admin | Updated: May 15, 2016 05:00 IST2016-05-15T05:00:20+5:302016-05-15T05:00:20+5:30

लुफ्थान्सा कंपनीच्या विमानाच्या गिअरमध्ये बिघाड झाल्याने छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर शुक्रवारी रात्री लुफ्थान्सा एलएच-७६४ या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले

Emergency landing at Mumbai airport | मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

मुंबई : लुफ्थान्सा कंपनीच्या विमानाच्या गिअरमध्ये बिघाड झाल्याने छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर शुक्रवारी रात्री लुफ्थान्सा एलएच-७६४ या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानातील १६३ प्रवासी सुखरूप असून, मुंबई विमानतळावर शेकडो प्रवाशांंंचा खोळंबा झाला. या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद करण्यात आली असून, चार आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली, तर एक विमान हैदराबादकडे वळवण्यात आले.लुफ्थान्साचे एलएच-७६४ क्रमांकाचे विमान म्युनिचमधून मुंबई विमानतळावर उतरणार होते. वेळापत्रकानुसार, शुक्रवारी रात्री ११.२० वाजता हे विमान लँड होणे अपेक्षित होते. मात्र १०.५० वाजण्याच्या सुमारास या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानाच्या गिअरमध्ये झालेल्या बिघाडाच्या कारणास्तव वैमानिकाने हे पाऊल उचलले. लँडिंगनंतरही हे विमान मुंबई विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर उभे असल्याने ही धावपट्टी तत्काळ बंद करण्यात आली. येथील उर्वरित सर्व वाहतूक दुसऱ्या धावपट्टीवर वळवण्यात आली.
मुख्य धावपट्टीवर उतरलेल्या विमानाचे चारही टायर नादुरुस्त झाले होते. हे विमान बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या काळात मुख्य धावपट्टी बंद ठेवण्यात आली होती. याचा फटका उर्वरित विमानांना बसला. त्यात एअर इंडिया, युनायटेड एअरलाइन्स आणि सिंगापूर एअरलाइन्स यांचा
समावेश होता. या काळात प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती, असे जीव्हीकेकडून स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Emergency landing at Mumbai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.