शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 

By दीपक भातुसे | Updated: October 18, 2024 07:31 IST

...मात्र, हे प्रयत्न करताना थेट अजित पवारांची साथ न सोडता आधी शरद पवारांकडून उमेदवारी मिळेल का, याची चाचपणी हे आमदार करत असल्याचे चित्र आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्याबरोबर गेलेले काही आमदार शरद पवारांकडे परतण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, हे प्रयत्न करताना थेट अजित पवारांची साथ न सोडता आधी शरद पवारांकडून उमेदवारी मिळेल का, याची चाचपणी हे आमदार करत असल्याचे चित्र आहे.

अजित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पाडल्यानंतर त्यांच्याबरोबर ४० आमदार गेले होते. त्यातील नीलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीत अजित पवारांची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश करून नगरमधून लोकसभा निवडणूक लढवत ती जिंकलीही. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने १० जागा लढवत ८ जागा जिंकल्या, तर दुसरीकडे अजित पवार गटाने ४ जागा लढवल्या आणि केवळ १ जागा जिंकली. विधानसभा निवडणुकीतही आपण शरद पवारांच्या विरोधात लढलो तर लढाई अवघड होईल, असा अंदाज ज्या आमदारांना आहे, ते शरद पवारांकडे परत जाण्याची चाचपणी करत आहेत. 

रामराजेंचे निकटवर्तीय शरद पवारांसोबत, माढ्यातही धक्का आतापर्यंत अजित पवार गटातील फलटणचे आमदार आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांचे निकटवर्तीय दीपक चव्हाण यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला. मात्र, रामराजे निंबाळकर हे मात्र अजित पवार गटात कायम आहेत. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही ते ‘मविआ’च्या उमेदवाराला मदत करतील, अशी शक्यता आहे.

शरद पवार गटाकडून उमेदवारी हवी म्हणून सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी अजित पवारांची साथ सोडली. मात्र, शरद पवारांकडून त्यांना उमेदवारीबाबत अद्याप शब्द देण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्यातरी अपक्ष लढण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात अस्वस्थता- शरद पवारांची सर्वात जास्त ताकद पश्चिम महाराष्ट्रात आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही पवारांनी या भागावर विशेष लक्ष दिले आहे. - त्यामुळेच अजित पवार गटातील या भागातील आमदारांमध्ये जास्त अस्वस्थता असल्याचे दिसून येते. त्यामुळे या भागातीलच अजित पवार गटाचे सर्वाधिक आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचे समजते.

राजेंद्र शिंगणे यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात अजित पवारांची साथ सोडण्यापूर्वी शरद पवारांकडून तिकीट मिळेल का, यासाठी काही आमदारांनी चाचपणी सुरू केली आहे. यात सिंदखेडराजा मतदारसंघातील अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी तीन दिवसांपूर्वी गुपचूप शरद पवारांची भेट घेतली. मात्र, त्यांनी अजून भूमिका जाहीर केलेली नाही. शिंगणेंनी भेट घेतल्यानंतर अजित पवार गटाकडून त्यांना आम्ही कसा निधी दिला, याचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत. तरीही शरद पवारांकडून तिकिटाचा शब्द मिळाला तर ते अजित पवारांची साथ सोडायला तयार असल्याचे त्यांच्या वक्तव्यांवरून दिसते.

आमदार अतुल बेनकेंचे बंधू शरद पवारांच्या भेटीला - पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे आमदार अतुल बनेकेही सध्या दोन दगडांवर पाय ठेवून आहेत. त्यांचे बंधू अमोल बेनके यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारी मिळेल का, याचीच चाचपणी केली आहे.- नरहरी झिरवाळ यांच्या भूमिकेबाबतही संशय घेतला जात आहे. झिरवाळ आपण अजित पवारांबरोबर असल्याचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे त्यांचा मुलगा गोकुळ झिरवाळ यांनी नुकतीच पुण्यात शरद पवारांची भेट घेतली आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारElectionनिवडणूक 2024